Home > Sports > किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात, कराड रेल्वे स्थानकावर पोलिसांची कारवाई

किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात, कराड रेल्वे स्थानकावर पोलिसांची कारवाई

किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात, कराड रेल्वे स्थानकावर पोलिसांची कारवाई
X

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर राजकारण तापले आहे. याच संदर्भात कोल्हापूरला निघालेल्या किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेण्यात आले आहे. ते रविवारी रात्री मुंबईहून महालक्ष्मी ट्रेनने निघाले होते, पण कोल्हापूरला पोहोचण्याआधी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्यानंतर सोमय्या यांना कराड रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. पण हसन मुश्रीफ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे

कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने कलम १४४ नुसार सोमय्या यांनी जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्याचे कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. किरीट सोमय्या हे कोल्हापूर जिल्ह्यात येवू नयेत, ते कोल्हापूर जिल्हयात आल्यानंतर त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील. किरीट सोमय्या हे कोल्हापूर वासियांना आव्हान देत आहेत, त्यांना त्याचे उत्तर कोल्हापुरी भाषेत दिले जाईल, खिंडीत गाठून गनिमी काव्याने कोल्हापूर हिसका दाखवला जाईल, असे आव्हान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिले होते. यानंतर सोमय्या यांनी कराड इथल्या सर्कीट हाऊसमध्येच पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

Updated : 20 Sep 2021 3:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top