Home > Sports > IPL-2024 | CSK VS LSG चेन्नईचा होणार आज लखनऊविरुध्द चौथा सामना

IPL-2024 | CSK VS LSG चेन्नईचा होणार आज लखनऊविरुध्द चौथा सामना

IPL-2024 | CSK VS LSG चेन्नईचा होणार आज लखनऊविरुध्द चौथा सामना
X

आयपीलच्या ३४ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुध्द सुपर किंग्स(CSK) असा सामना होणार आहे. लखनऊ येथे असलेल्या भारतरत्न श्री. अटलबिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियम(एकाना) या मैदानावर आज संध्याकाळी ७:३० वाजता हा सामना खेळला जाणार असून नाणेफेक ही अर्धा तास अगोदर म्हणजे ७ वाजता होणार आहे.

चेन्नईच्या यंदाच्या मोसमात ६ पैकी ४ सामने जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर लखनऊ ५ पैकी ६ सामने जिंकून पाचव्या स्थानावर आहे.

LSG आणि CSK यांच्यामध्ये आयपीलमध्ये एकुण ३ सामने झाले असून दोन्ही संघांनी एक-एक सामने जिंकले आहेत. तर एक सामना मात्र अनिर्णित राहिला.

संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू निकोलस पुर

केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊच्या संघाची या मोसमात सुरुवात चांगली झाली नाही. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर संघाने पुनरागमन करत सलग तीन सामने जिंकले. दुसऱ्या सामन्यात त्यांनी पंजाब किंग्जचा पराभव केला, तिसऱ्या सामन्यात त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा तर चौथ्या सामन्यात त्यांनी गुजरात टायटन्सचा पराभव केला. पण, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या गेल्या दोन सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला. संघाचा सर्वाधिक धावा करणारा निकोलस पुरन आहे. गोलंदाजीत यश ठाकूर अव्वल आहे.

हवामान स्थिती

शुक्रवारी लखनऊमध्ये ढगाळ वातावरण असेल पण पावसाची शक्यता नाही. वाराही जोरदार असेल. वाऱ्याचा वेग ताशी 22 किमी राहील. सामन्याच्या दिवशी येथील तापमान ३९ ते २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल.

Updated : 19 April 2024 1:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top