Home > Sports > भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर के.एल. राहुल उपकर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर के.एल. राहुल उपकर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर के.एल. राहुल उपकर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार
X

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरोधातील आगामी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर के.एल. राहुल उपकर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे वृत्त आहे. रोहित शर्मा पहिल्यांदाच कसोटीत उपकर्णधार झाला असता, पण हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो मालिकेतून बाहेर पडला. त्याच्या गैरहजेरीत के.एल. राहुल कर्णधार विराट कोहलीसह नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे.

याबाबत बीसीसीआयने ट्विट केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी (१३ डिसेंबर) सांगितले की, रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या समस्येमुळे दक्षिण आफ्रिकेविरोधातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. शुक्रवारी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. शनिवारी (१८ डिसेंबर) सरावाला सुरवातही झाली आहे.

बीसीसीआयने सांगितले की, 'टीम इंडियाचा कसोटी उपकर्णधार रोहित शर्माला मुंबईतील सराव सत्रादरम्यान डाव्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतून तो बाहेर पडला. रोहितच्या जागी प्रियांक पांचालला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. के.एल. राहुल हा रोहित शर्माचा ओपनिंग पार्टनर देखील आहे, त्यामुळे त्याला थोडा अनुभवही आहे.

भारतीय संघ 26 ते 30 डिसेंबर दरम्यान सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पहिला कसोटी सामना खेळणार आहे. दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून जोहान्सबर्गमध्ये, तर तिसरी कसोटी 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे. तर पहिले दोन एकदिवसीय सामने 19 आणि 21 जानेवारी रोजी पार्ल येथे खेळवले जाणार आहेत, तर तिसरा एकदिवसीय सामना हा 23 जानेवारीला केपटाऊन येथे खेळवला जाणार आहे. ओमिक्रॉन विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चार सामन्यांची टी-20 मालिका स्थगित करण्यात आली आहे. दोन्ही मंडळांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे.

Updated : 18 Dec 2021 12:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top