Home > Sports > पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताची 1-0 ने आघाडी

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताची 1-0 ने आघाडी

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे.भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताची 1-0 ने आघाडी
X

भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे अनिर्णित सुटला. त्यानंतर लॉर्ड्सच्या मैदानात झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर 151 धावांनी विजय मिळवला आहे. त्या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

भारताच्या पहिल्या डावातील 364 धावांच्या बदल्यात इंग्लंडने 391 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर भारताने 27 धावांच्या आघाडीचा पाठलाग करत अजिंक्य रहाणे आणि मोहम्मद शमीच्या अर्धशतकांच्या जोरावर 298 धावांवर डाव घोषित केला होता. इंग्लंडला 60 षटकांमध्ये 272 धाव करायच्या होत्या. मात्र भारताने दिलेले हे आव्हान इंग्लंडच्या संघाला पूर्ण करता आलं नाही. भारतीय गोलंदाजांनी 51.5 षटकांमध्ये अवघ्या 120 धावांत इंग्लंडचे सर्व फलंदाज बाद केले आणि हा रोमहर्षक सामना जिंकला.

दरम्यान, पहिल्या डावात शतक करणाऱ्या लोकेश राहुलला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Updated : 17 Aug 2021 1:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top