Home > Sports > IndVsPak : पाकिस्तानविरोधात भारतीय महिला संघ पराभवाचा वचपा काढण्यास सज्ज

IndVsPak : पाकिस्तानविरोधात भारतीय महिला संघ पराभवाचा वचपा काढण्यास सज्ज

Ind Vs Pakistan : भारत विरुध्द पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी महिला संघांमध्ये आज विश्वचषक स्पर्धेतील पहिलाच सामना होणार आहे. त्यापार्श्वभुमीवर भारतीय महिला संघ आशिया चषक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज झाला आहे.

IndVsPak : पाकिस्तानविरोधात भारतीय महिला संघ पराभवाचा वचपा काढण्यास सज्ज
X

दक्षिण आफ्रिकेत (sauth africa ) होत असलेल्या महिला T-20 विश्वचषक स्पर्धेत (World Cup ) यजमान दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच सामन्यात श्रीलंकेविरुद्ध हार पत्करावी लागली. त्यानंतर आज भारताचा सामना पाकिस्तानसोबत होत आहे. न्युसलँड केपटाऊन (cape town) या मैदानावर भारत विरुध्द पाकिस्तान महिला संघाचा विश्वचषक सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार (Indian Time) 6.30 वा. सुरु होणार आहे.

भारताने 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकल्यानंतर आता T-20 विश्वचषक स्पर्धेत भारताची पहिलीच लढत पाकिस्तानशी (India Vs Pakistan) होणार आहे. त्यामुळे भारतीय महिला संघाकडूनही अशाच प्रदर्शनाची अपेक्षा आहे.

भारताचा (India) पहिलाच सामना पाकिस्तानशी (Pakistan) होणार आहे. त्यामुळे भारतीय महिला संघ याआधीच्या सामन्यांमध्ये आपलं वर्चस्व दाखवणारा ठरला असला तरी आजच्या पाकिस्तानविरोधातील सामन्यात भारतीय संघ आपली सुरुवात कशी करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आशिया कप (Asia cup) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने आले होते. त्यावेळी भारतीय संघाला पाकिस्तानी महिला संघाकडून हार पत्करावी लागली होती. आता त्या पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्यानेच भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet kaur) खांद्यावर असणार आहे. मात्र भारतीय संघाची धडाकेबाज सलामीची फलंदाज स्मृती मांधना (Smriti Mandhana) दुखापत झाल्याने ती पहिला सामना खेळू शकणार नसल्याची चर्चा आहे.

महिला विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ एकाच गटात आहेत. तर पाकिस्ताननंतर भारतीय संघाला इंग्लड, आयर्लंड, वेस्ट इंडिस या संघांशी दोन हात करावे लागणार आहे.

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा या खेळाडूंवर संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे

Updated : 12 Feb 2023 11:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top