Home > Sports > Ind Vs NZ : भारताने मालिका जिंकला

Ind Vs NZ : भारताने मालिका जिंकला

भारत विरुध्द न्युझिलंड यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या वन डे सामन्यात भारताना रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर 90 धावांनी सामना जिंकला.

Ind Vs NZ : भारताने मालिका जिंकला
X

भारत विरुध्द न्युझिलंड (India Vs New Zealand) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची सीरीज सुरु होती. या सीरीजमधील अखेरचा सामना इंदौरच्या होळकर स्टेडियमवर खेळण्यात आला. यामध्ये भारताने तिसरा सामना 90 धावांनी जिंकला. (India won series 3.0)

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (shubhaman Gill) या सलामीवीर जोडीने शतकी खेळीच्या जोरावर 50 षटकांमध्ये 9 बाद 385 धावा मिळवून दिल्या. तर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याने तीन गडी बाद करीत ब्रेक थ्रु मिळवून दिला. त्यामुळे शार्दुल ठाकूरला मॅन ऑफ द मॅच (Man of the match) पुरस्कार देण्यात आला.

भारतीय संघाने 9 बाद 385 धावा केल्याने न्युझिलंडपुढे जिंकण्यासाठी 386 धावांचे लक्ष होते. मात्र सुरुवातीलाच न्युझिलंड संघाचा सलामीवीर फिन अॅलन (Fin Allen) याला हार्दिक पंड्याने (Hardik pandya) शुन्यावर बाद करून मोठे यश मिळवून दिले. मात्र डेव्हॉन कॉनवेने (Devon covan) चौकार-षटकार ठोकत भारतीय संघाच्या नाकात दम आणला होता. त्यामागे इशान किशनने (Ishan kishan) कॉनवे 57 धावांवर खेळत असताना विकेट कीपिंगची संधी गमावली. त्यानंतर अखेर कॉनवे 138 धावांवर बाद झाला. मात्र कॉनवेला हन्री निकोलस( Henry Nikolas), डॅरिल मिशेल (Daril Mischel), मायकेल ब्रेसवेल यांनी साथ दिली. त्यात हेन्रीने 42, मिशेलने 24 तर ब्रेसवेलने 26 धावा केल्या. दुसरीकडे शार्दुल ठाकूरने 45 धावांमध्ये तीन गडी बाद करून टीम इंडियाची गाडी रुळावर आणली. त्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. अखेर भारताने न्युझिलंडविरोधातील सामना 90 धावांनी जिंकला.

Updated : 25 Jan 2023 5:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top