Home > Sports > IND vs PAK : बाबर विरूध्द सुर्यकुमार; T20 मध्ये नंबर १ कोण? बाबर आझम म्हणतो...

IND vs PAK : बाबर विरूध्द सुर्यकुमार; T20 मध्ये नंबर १ कोण? बाबर आझम म्हणतो...

IND vs PAK : बाबर विरूध्द सुर्यकुमार; T20 मध्ये नंबर १ कोण?  बाबर आझम म्हणतो...
X

अवघ्या काही दिवसांवर T20 विश्वचषक स्पर्धा आली आहे. या स्पर्धेतील IND vs PAK या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मागील वर्षी UAE मध्ये झालेल्या विश्वचषकात पाकिस्तान ने भारताचा दारूण पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला भारत घेणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

पण या सामन्या मध्येही एक चुरशीची लढत सध्या रंगली आहे ती म्हणजे ICC च्या फलंदाजांच्या रँकिंगमध्ये बाबर आझम (Babar Azam) विरूध्द सुर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav)! भारताचा ३६० डिग्री खेळाडू म्हणुन ओळखला जाणारा सुर्यकुमार यादव हा सध्या तुफान फॉर्मात आहे. तसेच पाकिस्तानचा (Pakistan) खेळाडू बाबर आझम हा दुसरा विराट कोहली म्हणुन प्रसिध्द आहे. हे दोन्ही खेळाडू इतक्या फॉर्म मध्ये आहेत की सतत रँकिंगमध्ये (ICC Ranking) एकमेकांना वर खाली ढकलत आहे. त्यात आता विश्वचषकात (ICC T20 World Cup Australia) भारताचा सामना देखील पाकिस्तानविरूध्दच आहे.

याच पार्श्वभुमीवर बाबर आझम ने त्याच्या आणि सुर्यकुमार यादव मधील लढतीवर प्रतिक्रीया दिली आहे. क्राइस्टचर्च येथे बांग्लादेशला हरवल्यानंतर रँकिंग वरून सुरू असलेल्या स्पर्धेवर तो बोलला. बाबरने हे कबुल केलं की अव्वल स्थान हे बहुतेक फलंदाजांचं स्वप्नं असतं. रँकिंग्जमध्ये अव्वल येणं हे फलंदाजांसाठी प्रोत्साहित करणारं असतं. जे एका बुस्टर डोस सारखं काम करतं. ज्याचा अखेर संघाला देखील फायदा होतो.

Updated : 14 Oct 2022 9:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top