Home > Sports > Cricket रोहीत शर्मा व शुभमन गिलने रचला इतिहास; वनडेत सर्वोच्च धावांची भागीदारी ....

Cricket रोहीत शर्मा व शुभमन गिलने रचला इतिहास; वनडेत सर्वोच्च धावांची भागीदारी ....

Cricket रोहीत शर्मा व शुभमन गिलने रचला इतिहास; वनडेत सर्वोच्च धावांची भागीदारी ....
X

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना आज होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला, या सामन्यात सलामीवीर रोहीत शर्मा व शुभमन गिलने यांनी द्विशतकीय खेळी करत विश्वविक्रम रचला आहे .रोहीत शर्मा व शुभमन गिलने रुपाने वनडेत सर्वोच्च धावांची भागीदारी करणारी ठरली सलामी जोडी ठरली आहे .

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना आज मंगळवारी इंदोरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला .या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले , भारताकडुन सलामीसाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात उतरले.त्यांनी या सामन्यात दमदार खेळी करत दोंघानी वैयक्तिक शतके झळकावली. याबरोबरच त्यांच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे.

या सामन्यात न्यूझीलंड गोलंदाजाला पहिल्या विकेटसाठी 26 षटकापर्यत वाट पाहायला लागली,सलामीवी रोहित शर्मा आणि शुभमन गिल आक्रमक खेळी करत द्विशतकी भागीदारी रचली .या खेळात रोहित शर्माने 83 चेंडुत त्यांचे 30 वे शतक पुर्ण केले , रोहीत शर्माने 3 वर्षानंतर शतक झळकावले आहे. रोहित शर्माने 85 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांसह 101 धावांची खेळी केली. रोहित शर्माचे शतक पुर्ण होताच लगेचच शुभमन गिलने 72 चेंडू त्यांचे शतक झळकावले. विशेष म्हणजे दोन्ही फलंदाजाने 26 षटकातच आपली शतके झळकावली . शुभमन गिलने 78 चेंडूत 13 चौकार आणि 5 षटकारांसह 112 धावांची खेळी केली .

रोहीत शर्मा व शुभमन गिलने रचला विश्वविक्रम.....

रोहीत शर्मा व शुभमन गिलने आक्रमक खेळी करत 212 धावाची खेळी केली .212 धावांची सलामी भागीदारी रचत मोठा विक्रम केला.न्यूझीलंडविरुद्ध वनडेत सर्वोच्च धावांची भागीदारी करणारी सलामी जोडी ठरली आहे. 27 व्या शतकात रोहीत शर्माला मायकल ब्रेसवेलने याने त्रिफळा उडवत न्यूझीलंडसाठी पहिला विकेट मिळवला , 28 व्या षटकात शुभमनही ब्लेअर टिकनरच्या गोलंदाजीवर बाद झाला .

वनडे सामन्यातील सर्वाधिक शतके

सचिन तेंडुलकर - ४९ शतके

विराट कोहली - ४६ शतके

रोहित शर्मा - ३० शतके

रिकी पॉन्टिंग - ३० शतके

वनडेत सर्वोच्च धावांची भागीदारी करणाऱ्या सलामी जोड्या

212 धावा = रोहित शर्मा आणि शुभमन गिल, इंदोर, 2023

201* धावा= विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर, हेमिल्टन, 2009

201 धावा = सनथ जयसूर्या आणि उपूल थरंगा, नेपियर, 2006

Updated : 24 Jan 2023 1:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top