Home > Sports > FIFA world cup 2022 : एकही गोल न करता स्पेन ठरला विश्वविजेता

FIFA world cup 2022 : एकही गोल न करता स्पेन ठरला विश्वविजेता

Fifa world cup 2022 : एकही गोल न करता स्पेन ठरला विश्वविजेता, पण हे कसं झालं शक्य जाणून घेण्यासाठी वाचा....

FIFA world cup 2022 : एकही गोल न करता स्पेन ठरला विश्वविजेता
X

Fifa world cup 2022 : नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या कोलंबिया विरुध्द स्पेन या अंतिम सामन्यात स्पेनने एकही गोल न करता स्पेन विश्वविजेता ठरला आहे.

नवी मुंबईतील (Navi Mumbai) डी वाय पाटील (Dy patil stadium) मैदानात झालेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक (Fifa world cup) स्पर्धेत स्पेनच्या महिला संघाने कोलंबियाला हरवून सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. यामध्ये स्पेनने कोलंबियावर 1-0 अशी मात केली.

अंतिम सामन्यात स्पेन विरुध्द कोलंबिया (spain vs columbia) सामन्याचा थरार रंगला होता. यामध्ये कोलंबियाची खेळाडू एना गुजमॅन (Ana Gujman) यांच्याकडून एक आत्मघाती गोल केला. त्यामुळे स्पेनच्या संघाला एक गुण देण्यात आला. मात्र यानंतर अखेरपर्यंत दोन्हीही संघाला एकही गोल न करता आला नाही. मात्र कोलंबिया संघाच्या एना गुजमन या खेळाडूने केलेल्या चुकीमुळे स्पेन 1-0 अशा अटीतटीच्या सामन्यात विजयी झाले.

अत्यंत चुरशीच्या सामन्यात स्पेनने विजय साकारत विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. त्यामुळे स्पेनच्या संघाचे जगभरातून कौतूक होत आहे.

11 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान रंगला होता थरार 17 वर्षाखालील फिफा फुटबॉल महिला विश्वचषक सामने भारतात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये जगभरातील 16 देशांनी सहभाग घेतला होता. यामध्ये स्पेनने विश्वचषक पटकावला.

चार वर्षानंतर झाले होते आयोजन

फिफा फुटबॉल विश्वचषक कोरोनामुळे झाला नव्हता. त्यामुळे चार वर्षानंतर यंदा भारतात या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. तर या विश्वचषकातील सामने कलिंग स्टेडियम (kaling stadium, Bhuvaneshwar)(भुवनेश्वर, ओडिशा), पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम (pandit jawaharlal neharu stadium margo) (मार्गो, गोवा) और डी वाय पाटील स्टेडियम (नवी मुंबई) (Dy patil stadium navi mumbai) येथे पार पडले. या विश्वचषकामध्ये चार गृपच्या माध्यमातून 32 सामने खेळवण्यात आले होते.

नायजेरिया, कोलंबिया, स्पेन आणि जर्मनी हे चार संघ सेमीफायनलमध्ये पोहचले होते. त्यातील कोलंबिया आणि नायजेरिया यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात एकही गोल झाला नव्हता. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटच्या माध्यमातून कोलंबियाने नायजेरिया संघावर विजय मिळवला. त्यानंतर स्पेनने 1-0 अशा फरकाने जर्मनीवर विजय मिळवला. त्यामुळे अंतिम सामना कोलंबिया विरुध्द स्पेन असा झाला. यामध्ये स्पेनने जोरदार विजय साजरा केला.

Updated : 31 Oct 2022 8:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top