Home > Sports > CSK ने जिंकला IPL चा पहिला सामना ; RCB चा ६ विकेटने पराभव

CSK ने जिंकला IPL चा पहिला सामना ; RCB चा ६ विकेटने पराभव

CSK ने जिंकला IPL चा पहिला सामना ; RCB चा ६ विकेटने पराभव
X

पाच वेळा चॅम्पियनशिप मिळवलेल्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल- २०२४ ची सुरुवात आपल्या विजयाने केली आहे. नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने (CSK) या हंगामातील सलामीच्या सामन्यात आरसीबीचा (RCB) ६ गडी राखून पराभव करत विजय मिळवला आहे.

चेन्नईमधल्या चेपॉक स्टेडीयमवर नाणेपेक जिंकल्यानंतर आरसीबीने २० षटकांत ६ गडी गमावून १७३ धावा केल्या. अनुज रावत याने सगळ्यात जास्त ४८ धावा केल्या. विराट कोहलीला २० चेंडूत केवळ २१ धावा करता आल्या. मुस्तफिजूर रहमानने ४ बळी घेतले. प्रत्युत्तरात चेन्नईने १८.४ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. शिवम दुबे (३४), आणि रवींद्र जडेजा याने (२५) यांच्याकडून ५ व्या विकेटसाठी नाबाद ६६ धावा काढल्या.

Updated : 23 March 2024 5:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top