Home > Sports > ICC T20 World Cup 2022 : नामिबियाचा आशिया चषक विजेत्या श्रीलंकेवर धक्कादायक विजय

ICC T20 World Cup 2022 : नामिबियाचा आशिया चषक विजेत्या श्रीलंकेवर धक्कादायक विजय

ICC T20 World Cup 2022 : नामिबियाचा आशिया चषक विजेत्या श्रीलंकेवर धक्कादायक विजय
X

रविवार १६ सप्टेंबर २०२२ पासून ऑस्ट्रेलिया (Australia) येथे T20 World Cup ला धडाक्यात सुरूवात झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात नवख्या नामीबियाने(Namibia) आशिया चषक जिंकलेल्या श्रीलंकेला(Sri Lanka) पराभूत केलं. १-२ नव्हे तर तब्बल ५५ धावांनी मोठा विजय नामीबियाने मिळवला आहे.ICC T20 World Cup 2022 Australia स्पर्धेचा पहिलाच सामना श्रीलंका आणि नामिबीया मध्ये रंगला होता. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं आणि नामीबियाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. यावेळी नामिबीयाने श्रीलंकन गोलंदाजांचा समाचार घेत १६३ धावा कुटल्या आणि लंकेसमोर १६४ धावांच आव्हान उभं केलं. यात जेम फ्रायलिंक याने सर्वाधिक २८ चेंडूत ४४ धावा केल्या. तर श्रीलंकन गोलंदाज प्रमोद मदुशान याने सर्वाधिक २ गडी बाद केले.


तर दुसरीकडे श्रीलंकेला १६४ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या फलंदाजांना नामिबीयन गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली आणि अवघ्या १०८ धावांवर रोखत ५५ धावांनी मोठा विजय मिळवला. यात कर्णधार शनका ने सर्वाधिक २३ चेंडूत २९ धावा केल्या. नामीबियन गोलंदाजांमध्ये डेव्हिड वायजी, बर्नार्ड स्कॉल्ट्झ, बेन शिकोंगो, आणि जॅन फ्रायलिंक यांनी अनुक्रमे २ खेळाडूंना बाद केलं. अष्टपैलू कामगिरी करणारा नामीबियाचा खेळाडू जॅन फ्रायलिंक याला सामनावीर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलं.

Updated : 16 Oct 2022 8:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top