Home > Sports > BCCI चं मोठं पाऊल! आता महिला खेळाडूंना देखील मिळणार एका सामन्याचं १५ लाख मानधन

BCCI चं मोठं पाऊल! आता महिला खेळाडूंना देखील मिळणार एका सामन्याचं १५ लाख मानधन

BCCI चं मोठं पाऊल! आता महिला खेळाडूंना देखील मिळणार एका सामन्याचं १५ लाख मानधन
X

BCCI म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महत्वाचा निर्णय़ घेतला आहे. BCCI चे सचिव जय शाह(Jay Shah) यांनी महिला आणि पुरूष क्रिकेट संघांच्या मानधनामध्ये समानता आणण्याचा निर्णय घेतला आहे. आता महिला खेळाडूंना देखील पुरूष खेळाडूंइतकंच मानधन प्रत्येक सामन्यासाठी मिळणार आहे. सर्व स्तरातून BCCI च्या या निर्णयावर कौतूकाचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय.

भारतात क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही तर तो एक धर्म आहे. फक्त पुरूषच नाही तर अनेक महिला खेळाडू आता भारतात घडत आहेत. भारताच जसा पुरूष संघ आहे तसाच महिलांचा देखील संघ आहे. पण या दोन्ही संघांच्या खेळाडंच्य़ा मानधनात जमिन आसमानाचा फरक आपल्य़ाला पाहायला मिळत होता. पण गेल्या काही काळापासून भारतीय संघांच्या महिला खेळाडूंनी देखील आपल्या खेळाचा स्तर उंचावला आहे. त्यामुळे भारतीय नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी भारतीय महिला खेळाडूतं मानधन देखील पुरूष खेळाडूंइतकंच दिलं जाणार असल्याची घोषणा केली आहे.

मला जाहीर करण्यात आनंद होत आहे @BCCI चे भेदभावाचा सामना करण्याच्या दिशेने पहिले पाऊल. आम्ही आमच्या करार केलेल्यांसाठी वेतन इक्विटी धोरण लागू करत आहोत. क्रिकेटमधील लिंग समानतेच्या नवीन युगात जात असताना पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी मॅच फी समान असेल. असं ट्विट जय शाह य़ांनी केलं आहे.

याआधी समान वेतन धोरण लागू करण्यासंदर्भात भारताची आघाडीची महिला खेळाडू स्मृती मानधना (Smriti Mandhana ) हिनं देखील आवाज उठवला होता. परंतू काही दिवसांपूर्वी भारतीय़ महिला संघाने आशिया चषकावर आपलं नाव नोंदवलं आणि BCCI ने हा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं. या नव्य घोषणेनुसार महिला खेळाडूंना देखील आता प्रत्येक टेस्ट सामन्यानंतर १५ लाख, एकदिवसीय सामन्यानंतर ६ लाख तर टी२० सामन्यासाठी ३ लाख रूपये मिळणार आहेत.

आधी मिळायचे फक्त २०००० रूपये!

या आधी वरीष्ठ महिला खेळाडूंना प्रत्येक सामन्याच्या दिवशी केवळ २०००० रूपये मिळत होते. इतकेच पैसे एक १९ वर्षाखालील खेळाडूला BCCI भत्ता म्हणून देतं. पुरूष खेळाडूंच्या बद्दल विचार करायला गेलो तर पुरूष खेळाडूंना सामन्याच्या आधी सराव दिवसांना दिवसाकाठी ६० हजार रूपये भत्ता दिला जात होता. आता समान वेतन धोरणामुळे महिला क्रिकेटपटूंना मोठा आधार मिळणार आहे.

भारताची दिग्गज महिला खेळाडू तसेच जगात सर्वाधीक एकदिवसीय धावा करणारी मिथाली राज (Mithali Raj) हिने देखील या निर्णयाचं स्वागत केलं.

"भारतातील महिला क्रिकेटसाठी हा ऐतिहासिक निर्णय! पुढील वर्षी WIPL सोबत वेतन इक्विटी धोरण, आम्ही भारतातील महिला क्रिकेटसाठी एका नवीन युगाची सुरुवात करत आहोत. धन्यवाद जय शाह सर आणि BCCI हे घडवून आणण्यासाठी. आज खरंच खूप आनंद झाला."

Updated : 27 Oct 2022 9:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top