Home > Sports > Team India दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी

Team India दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी

Team India दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी
X

टीम इंडिया आणि वेस्ट इंङिज संघामधील दुसरा एकदिवसीय सामना आज (शनिवारी) संध्याकाळी सात वाजता होणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाने ५ विकेट्सने विजय मिळवला होता. पहिल्या सामन्यामध्ये आधी युवा खेळाडूंना संधी दिली गेली होती. मात्र ईशान किशन सोडता इतर कोणत्याही खेळाडूला आपली छाप टाकता आली नाही.

आजचा दुसरा सामना कॅरेबियन खेळाडूंसाठी करो या मरो असा आहे. तर दुसरीकडे टीम इंडियासाठी मालिका जिंकण्याची संधी आहे. मात्र, अशातच दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सामना सुरू झाल्यानंतर बारबाडोस मध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा सामना रद्द होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Updated : 29 July 2023 10:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top