Home > Sports > ऑलिम्पिकपटू वंदना कटारियाला जातीवर शिव्या देणारे कोण आहेत?

ऑलिम्पिकपटू वंदना कटारियाला जातीवर शिव्या देणारे कोण आहेत?

जात नाही ती जात, ऑलिम्पिक पटू वंदना कटारिया आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव मोठं करत असतानाही भारतात तिला जातीवरून शिव्या घालणारे नक्की कोण आहेत. वाचा मुकुल निकाळजे यांचा लेख

ऑलिम्पिकपटू वंदना कटारियाला जातीवर शिव्या देणारे कोण आहेत?
X

वंदना कटारिया भारतीय हॉकी संघाची स्टार फॉरवर्ड आहे. तिच्या गोल्समुळे अनेक सामने, स्पर्धा भारताने जिंकल्या आहेत. आजवर ऑलिम्पिक Tokyo Olympics स्पर्धेत हॅटट्रिक नोंदवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. परंतु तिने ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच प्रतिनिधित्व केल्याने, हॉकीत भारताची मान उंचावल्यामुळे तिला आणि तिच्या परिवाराला जातीय अत्याचार, जातीवाचक शिवीगाळास सामोरं जावं लागलं आहे.

ऑलिम्पिक सेमी फायनल मधे अर्जेंटिना कडून भारतीय महीला 1-2 म्हणजे केवळ एका गोलच्या फरकाने पराभूत झाल्या. पराभूत झाल्या असल्या तरी वंदना कटारिया सह संपूर्ण संघाने फार चांगली हॉकी खेळली. परंतु वंदना कटारियाच्या गावातील जातीचा माज असलेल्या सवर्ण समाजातील हरामखोरांनी, देशद्रोह्यांनी भारतील संघ पराभूत झाला याचा चक्क नाचत, कुदत आनंद साजरा केला आणि वंदनाच्या परिवाराला व वंदनाला उद्देशून शिवीगाळ केली.

भारतीय टीम मध्ये खूप साऱ्या दलित खेळाडू होत्या. म्हणूनच भारत पराभूत झाला, असेच पाहिजे, असं म्हणत भारताच्या पराभवाचा आनंद साजरा ते 2 जात्यांध हरामखोर वंदनाच्या परिवारातील सदस्यांना जातिवाचक शिवीगाळ करत होते.

दलितांनी आरक्षणाच्या आधारे स्वतःची आणि देशाची प्रगती केली तर ती खटकतेच परंतु जिथे आरक्षण नाही. तिथे आपले कर्तुत्व सिद्ध करून, तथाकथित मेरिट वाद्यांना मागे टाकून प्रगती केली, देशाचा बहुमान केला तरी तो खटकतो.



दलितांना समता मिळवण्याची मिळालेली संधीच खटकते. राष्ट्र नावाची कल्पना अजून या देशात तयारच झालेली नाही. सवर्ण, जात्यांध, आरक्षण विरोधी हे कितीही राष्ट्रवादाच्या पोकळ गप्पा करत असेल तरी ते जातीच्या बाबतीत राष्ट्रद्रोही आहेत. हेच यातून सिद्ध होते.

म्हणूनच बाबासाहेब म्हणायचे की जात ही एकमेव बाब या देशात राष्ट्रद्रोही आहे. ज्यांना ज्यांना हे भारत देशात राष्ट्र नावाची संकल्पना निर्माण व्हावी असे वाटते. त्यांनी त्यांनी जात संपवण्यासाठी काम केले पाहिजे. विशेषतः उच्च जातीय सवर्णांनी.

- मुकुल निकाळजे

Updated : 7 Aug 2021 3:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top