Home > Politics > औरंगाबाद: 'मनसे'कडून निवडून आलेला एकमेव 'झेडपी सदस्य' राष्ट्रवादीच्या मार्गावर; विधानसभा लढवली 'वंचित' कडून

औरंगाबाद: 'मनसे'कडून निवडून आलेला एकमेव 'झेडपी सदस्य' राष्ट्रवादीच्या मार्गावर; विधानसभा लढवली 'वंचित' कडून

औरंगाबाद: मनसेकडून निवडून आलेला एकमेव झेडपी सदस्य राष्ट्रवादीच्या मार्गावर; विधानसभा लढवली वंचित कडून
X

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लक्षात घेता स्थानिक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे अनेक जण सत्तधारी पक्षात जाने पसंद करत आहे. तर गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतून औरंगाबाद जिल्ह्यातून 'मनसे'कडून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण आता राष्ट्रवादीच्या मार्गावर असून,लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेला राम-राम करत वंचित कडून निवडणूक लढवली होती.

विजय चव्हाण हे मनसेचे कट्टर नेते समजले जायचे. मनसेच्या उमेदवारीवर ते आतापर्यंत तीनवेळा निवडून आले आहेत. पण विधानसभा निवडणुकीत वंचितमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली. त्यांनतर आता राष्ट्रवादीच्या गोटात सामील होणार असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट...

शनिवारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी चव्हाण यांच्या कार्यालयाला भेट दिली.तसेच यावेळी लवकरच पक्ष प्रवेश करण्याचे ठरलं असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी निवडणुका पाहता स्थानिक राजकीय घडामोडींना वेग आला असल्याचे स्पष्ट होत आहे.

Updated : 2 Oct 2021 7:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top