Home > Politics > कर्नाटकातील येडियुरप्पा पर्वाचा अखेर: मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

कर्नाटकातील येडियुरप्पा पर्वाचा अखेर: मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

कर्नाटकातील येडियुरप्पा पर्वाचा अखेर: मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
X

गेली काही दिवस चर्चेत असलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा आज अखेर राजीनामा राज्यपाल यांना सोपवला आहे. त्यामुळे कर्नाटकतील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे.

त्यांनी राजीनामा देण्याआधी 35 मिनिटे भाषण केले. यादरम्यान त्यांच्या डोळ्यांत बऱ्याचदा अश्रू आले. आपण भाजपला राज्यात मोठं करण्यासाठी काय काय केलं. याबाबत भावना व्यक्त केल्या.




वाढत्या वयामुळे केंद्रीय नेतृत्वाकडून येडियुरप्पा यांना राजीनामा देण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
येडियुरप्पा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिकारीपुरातील पुरसभा अध्यक्षापासून केली होती. १९८३ साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

आठवेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा चौथा कार्यकाळ आहे. या कारकिर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले.

२०१८ विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक ११० जागा मिळवत क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. मात्र बहुमताचा आकडा पक्ष गाठू शकला नव्हता. त्यासाठी त्यांनी ६ अपक्ष आमदारांना गळ घातली होती. मात्र त्यांच्या जीवावर सरकार फार काळ टिकू शकणार नाही याचा अंदाज आल्याने जेडीएस आणि काँग्रेसकडे मोर्चा वळवला होता. याला 'ऑपरेशन कमळ' असं नाव देण्यात आलं होतं. सात आमदारांना राजीनामा द्यायला लावून त्यापैकी ५ जण निवडूनही आले होते. कर्नाटकमध्ये भाजपाने २०१९ मध्ये काँग्रेस-जेडीयूचं सरकार पाडलं. त्यानंतर बीएस येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची पुन्हा शपथ घेतली होती.

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून लिंगायत समाजाचे नेते मृगेश निरानी, बसवराज बोम्मई, वोक्कालिगा समाजाचे नेते अस्वथ नारायण, आर अशोक, सी टी रवी आणि प्रल्हाद जोशी यांच्या नावाची चर्चा आहे.

Updated : 26 July 2021 8:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top