Home > Politics > युवा नेते रणजीत बागलांचा स्वाभिनीला जय महाराष्ट्र: ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

युवा नेते रणजीत बागलांचा स्वाभिनीला जय महाराष्ट्र: ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

युवा नेते रणजीत बागलांचा स्वाभिनीला जय महाराष्ट्र: ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
X

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या राज्य प्रवक्ते रणजीत बागल यांनी पदाचा राजीनामा दिला असून मुंबई मातोश्री येथे उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

बागल यांनी कालच च ईमेलद्वारे स्वाभिमानी मध्यवर्ती कार्यालयास पाठविला होता. `` अवघ्या काही वेळाने मी एक नवी राजकीय वाटचाल सुरू करत आहे. आदरणीय राजु शेट्टी साहेबांनी माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला राज्याच्या महत्वपूर्ण पदाची आजवर जबाबदारी दिली याबद्दल ऋणातून उतराई होणे शक्य नाही, परंतु योग्य वेळी योग्य निर्णय हे घ्यावे लागतात.. आपल्या सर्वांचे सहकार्य असे मिळत राहील ही अपेक्षा व्यक्त करून थांबतो.. धन्यवाद.. जय महाराष्ट्र..`` असे म्हटले होते.

रणजीत बागल हे युवा कार्यकर्ते असून ते खंदे राजु शेट्टी सर्मथक होते. हातकणंगले लोकसभा मतदार संघातून राजू शेट्टी यांचा पराभव झाल्यानंतर बागल प्रचंड अस्वस्थ झाले होते. खासदार राजू शेट्टी यांची प्रतिमा 'शेतकऱ्यांचा हक्काचा नेता' अशीच आहे. राज्यासह देशभरातील अनेक शेतकरी आंदोलनांचं नेतृत्त्व राजू शेट्टी यांनी केले आहे. लोकवर्गणीतून निवडून येणारा आणि शेतकरी-कष्टकऱ्यांच्या प्रत्येक हाकेला धावून जाणारा नेता म्हणूनही राजू शेट्टींची ओळख आहे. ऊसदराचा प्रश्न असो वा शेतीशी संबंधित इतर कुठलाही प्रश्न असो, राजू शेट्टी रस्त्यावर उतरण्यास तयार असतात. अशा नेत्याचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्याचेच प्रतिबिंब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रणजित बागल यांनी पोस्ट लिहून व्यक्त केलं होतं.

जेव्हा जेव्हा ऊस गव्हाणीत जाईल अन् शेतकरी पैशाची वाट पाहत राहिल.. खासदार साहेब शप्पथ तेव्हा तुमची आठवण आल्याशिवाय राहनार नाही. आता जातीकडं बघुन दाबलेली बटनं दाबनारा जेव्हा घामाचे दाम न मिळालेल्यामुळे परवड होताना पाहुन हा शेतकरी साहेब नक्कीच तोंडात मारून घेतल्याशिवाय राहनार नाही. ना भगवा दाम मिळवुन देईल ना हिरवा चारा मिळेल. दुध पाण्याच्या मोलात विकु लागेल तेव्हा म्हशीच्या कासेला हात लावल्यालावल्या साहेब तुम्ही आठवनारंच. साहेब आपल्याला नाकारलं आपण चुकलो आपण खरंच चुकलो. लोकांना त्यांच्या पिकवलेल्या ऊसाची किंमत लक्षात आणुन देवुन चुकलो. दरवर्षी लाखो रूपये फायदा शेतकऱ्यांच्या खिशात दिला हे चुकलंच आपलं. हजारो किलोमीटर पायाला फोड येवुनही आपण चाललात. अक्षरशः बेशुद्ध होईपर्यंत रणरणत्या उन्हात चाललात.

चुकलं साहेब तुमचं चुकलंच. फुलेंचा आसुड या शासकांवर चालवुन शोषितांना न्याय दिला हे चुकलंच साहेब का बरं तुम्ही स्वतःचा घरसंसार स्वतःचं कौटुंबिक आयुष्य सोडुन आमच्या सारख्या या कृतघ्न लोकांसाठी लढत राहिलात. ही लोकं उपकार विसरनारी आहेत साहेब ही लोकं आजचं बघतात साहेब. नको होतं आयुष्य पणाला लावायचं हे लोकं असेच गंजुन पडायला हवे होते. अशाचं घराघरातल्या मुलांमुलांसाठी नको होतं तुम्ही लढायला. साहेब का हो तुम्ही लढलात आमच्यासाठी मुळात आम्हीच स्वार्थी ओ. आम्हाला आमच्या जातीचा खासदार पाहिजे होता कारण तो उद्यापासून आमच्या घरात टोपल्यात भाकरी देवुन जानार होता. तो आमच्या तिजोरीत पैसे देवुन जानार होता तो आमच्या ऊसासाठी रस्त्यावर उतरनार आहे. तो आमच्या ऊसदरप्रश्नी उपोषणाला बसनार आहे. तो आमच्या जातीतल्या प्रत्येक तरूणाला भरगच्च कमाईची नोकरी देनार आहे. साहेब तुम्ही का हो त्या जातीत जन्माला आला.. का तुम्ही या रंजीतच्या जातीत जन्माला आला नाहीत. अहो आता जो निवडुन आलाय तो शिवरायांच्या विचारांवर चालनार आहे म्हणतोय पण त्यांनंच कारखाना हडप केला हे लोकांना समजलं नाही का..? त्याची जात तुमच्यापेक्षा वरचढ ठरली बघा. साहेब तुम्ही आता आमच्यासाठी तुमचं रक्त नका वाया घालवुत. आम्ही लाचार आहोत तसेच राहू लाचार आता इथुन पुढे तर गुलाम होऊ आमच्या जातीचे तुमचाच रणजित असं लिहलं होतं.

मध्यंतरी रणजित बागल यांनी विधानसभा निवडणुकांपूर्वी स्वाभिमानीची नेते रविकांत तुपकर यांच्या सोबत त्यांनी रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासोबत जात भाजपशी जवळीक केली होती. परंतू ताबडतोब तुपकर आणि बागल यांनी रयतची साथ सोडून पुन्हा स्वाभिमानीची कास धरली होती.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी रणजित बागल यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या राज्य प्रवक्तेपदी नेमले होते. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विविध राजकीय मुद्द्यावर ते सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतातात. योग्य वेळी योग्य निर्णय हे घ्यावे लागतात.. आपल्या सर्वांचे सहकार्य असे मिळत राहील ही अपेक्षा व्यक्त करून रणजीत बागल यांनी उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Updated : 2 Feb 2023 7:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top