Home > Politics > भाजपमधल्या निष्ठावंताना शुभेच्छा, यशोमती ठाकूर यांचं खोचक ट्वीट

भाजपमधल्या निष्ठावंताना शुभेच्छा, यशोमती ठाकूर यांचं खोचक ट्वीट

भाजपमधल्या निष्ठावंताना शुभेच्छा, यशोमती ठाकूर यांचं खोचक ट्वीट
X

महाराष्ट्रात सुरु असलेला राजकीय संघर्ष कधी थांबेल. हे अद्यापपर्यंत कोणीही सांगू शकत नाही. गेल्या 10 ते 11 दिवसांपासून सुरू असलेला राजकीय संघर्ष एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर थांबेल. असं वाटत असताना शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 39 आमदारांनी आज विधानसभाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत शिवसेना पक्षाचा अधिकृत व्हीप पाळला नाही. त्यामुळं अजुनही या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.

शिवसेनेच्या 39 आमदारांनी राहुल नार्वेकर यांना मतदान केले. त्यामुळं भाजपचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकले. राहुल नार्वेकर या अगोदर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात होते. आता ते भाजप सदस्य आहेत. एकनाथ शिंदे हे देखील शिवसेनेचे आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर हे देखील मनसे त होते. यावरुन माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

आउटसोर्स मुख्यमंत्री, आउटसोर्स विधानसभा अध्यक्ष, आउटसोर्स विधानपरिषद विरोधी पक्ष नेते असा सगळा कारभार आहे. भाजप मधल्या निष्ठावंतांना शुभेच्छा!!! नवनिर्वाचित अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांचे मनापासून अभिनंदन. #Maharashtra #अससेम्ब्लयापेकर अशा शब्दात भाजपवर निशाणा साधला.


Updated : 3 July 2022 9:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top