Home > Politics > सुपरमार्केटमध्ये मद्यविक्रीला परवानगी; शेतक-यांचा होणार फायदा : नवाब मलिक

सुपरमार्केटमध्ये मद्यविक्रीला परवानगी; शेतक-यांचा होणार फायदा : नवाब मलिक

सुपरमार्केटमध्ये मद्यविक्रीला परवानगी; शेतक-यांचा होणार फायदा : नवाब मलिक
X

राज्यातला सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. १००० चौरस फुटाच्या दुकानातच वाईन विक्री करता येणार आहे.शेतकर्यांच्या फळ उत्पादनावर वाईनरी चालते.त्यांना चालना देण्यासाठी वाईन विक्री करता येणार आहे, असे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

अनेक बेकरी पदार्थांमध्ये वाईनचा उपयोग होत असतो. बहुतेक वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे वाईनचा वापर चवीसाठी केला जात असतो. आधी राज्य सरकारनं वाईनवर प्रति लिटर १० रुपयांचा अबकारी कर जाहीर केला आहे. त्यामुळे वाईन थोडी महाग होणार आहे.

मंत्री मंडळात घेण्यात आलेल्या या निर्णयाला भाजप नेते प्रविण दरेकरांनी विरोध दर्शवला आहे.हा निर्णय अत्यंत दुर्देवी असुन हे सरकार दारुड्यांची काळजी घेतयं. येणारी पिढी बर्बाद होईल याची फिकीर या सरकारला नाही, असं म्हणुन सरकारवर दरेकरांनी ताशेरे ओढले आहेत.शेतकर्यांच्या नावावरं किराणामालाच्या दुकानावर वाईन विकुन सरकार व्याभिचार करत आहे.बेवड्यांना सर्मपित अशाप्रकारचा निर्णय सरकारने घेतला आहे.या सरकारला ना मंदिरांची काळजी.ना शिक्षणाची काळजी पण दारु विक्रेत्यांची आणि दारु पिऊन कुटूंबच्या कुटुंब उधवस्त करणार्यांना हे सरकार अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन देत आहे असे आरोप दरेकरांनी महाविकास आघाडीवर केले आहेत.

Updated : 27 Jan 2022 2:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top