- ठाकरे सरकारने घेतलेत हे मोठे निर्णय ...
- नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या टेलरची हत्या, व्हिडीओतून पंतप्रधान मोदी यांनाही धमकी
- पाऊस असमाधानकारक, पेरण्या खोळंबल्या;मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामाचा
- राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती होणार :गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
- कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांची मदत
- मुंबईतील इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली
- कुर्ला इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, बचाव कार्य सुरूच
- राजकीय सत्तानाट्यात दिवसभरात काय घडले?
- Alt news चे सहसंस्थापक मोहम्मद जुबैर यांना अटक
- सांगलीतील 9 जणांची आत्महत्या नव्हे हत्या, गूढ उलगडलं

मोदी सरकारचा ट्विटरकडून राजकारणासाठी वापर, राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
XPhoto courtesy : social media
ट्विटरने मागील आठवड्यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट लॉक केलं होतं. त्यानंतर गुरुवारी ट्विटरने काँग्रेसच्या आणखी काही नेत्यांची अकाऊंट्स देखील लॉक केली आहेत. आता थेट काँग्रेस पक्षाचंच मुख्य अकाऊंट ट्विटर इंडियानं लॉक केलं आहे.
त्यानंतर आज राहुल गांधी यांनी या संदर्भाक माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी राहुल यांनी ट्वीटर भारताच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. ट्वीटर मोदी सरकारच्या दबावाखाली हे काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ट्विटर खाते बंद करून एका कंपनीने राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे. व्यवसाय करणारी कंपनी देशात राजकारण करण्याचं काम करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
काय म्हटलंय राहुल गांधी यांनी...
हा केवळ राहुल गांधींवर हल्ला नाही. हे फक्त राहुल गांधींना गप्प करण्याबद्दल नाही. माझे जवळजवळ १९ ते २० दशलक्ष फॉलोअर्स होते आणि तुम्ही त्यांना त्यांचे मत व्यक्त करण्यापासून रोखत आहात. हे तुम्ही काय करत आहात? ट्विटरने या कृतीने हे सिद्ध केले आहे की न्यूट्रल प्लॅटफॉर्म नाही. गुंतवणूकदारांसाठी ही एक धोकादायक गोष्ट आहे. कारण राजकीय स्पर्धेत कोणाची बाजू घेतल्यास ट्विटरसाठी वाईट परिणाम होऊ शकतात.
ट्विटरचं स्पष्टीकरण...
ट्विटरच्या म्हणण्यानुसार ही कारवाई गोपनीयता आणि वैयक्तिक सुरक्षेसाठी करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत गेल्या आठवड्यात ९ वर्षांच्या दलित मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाची छायाचित्रे पोस्ट केल्यामुळे ट्विटरने राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांची खाती लॉक केली आहेत. शिवाय काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर खातेही लॉक करण्यात आले आहे.
"कंपनीचे नियम प्रत्येकाला निष्पक्षपणे लागू केले जातात. आमच्या नियमांचे उल्लंघन करत पोस्ट करणाऱ्या अंदाजे शंभर ट्वीट्सवर आम्ही सक्रिय कारवाई केली आहे. या प्रकारची काही वैयक्तिक माहिती इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त धोका निर्माण करते. व्यक्तींची गोपनीयता आणि सुरक्षितता जपण्याचे आमचे ध्येय आहे." असे ट्विटरच्या प्रवक्त्याने यावेळी सांगितले.
याशिवाय, "ट्विटर प्रत्येकाला ट्विटर नियमांशी परिचित होण्यासाठी आणि त्यांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही गोष्टीची तक्रार करण्यास प्रोत्साहित करते. ट्विटरच्या मते, जर एखादे ट्विट त्याच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले आणि वापरकर्त्याने ते काढले नाही, तर मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ते एका नोटिसीच्या मागे लपवते. यासोबतच, जोपर्यंत ते ट्विट काढून काढुन टाकत नाही तोपर्यंच ट्विटर खाते ब्लॉक राहते." असे देखील ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले.
ट्विटरने यावर आणखी माहिती देताना सांगितले की, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग(NCPCR)ने विशिष्ट बाबींविषयी सतर्क केले आहे. ज्यात कथित लैंगिक अत्याचार पीडितेच्या पालकांची ओळख उघड झाली. काँग्रेस नेत्यांनी केलेल्या पोस्टचे पुनरावलोकन केले तर त्या पोस्ट ट्विटरचे नियम तसेच भारतीय कायद्याच्या विरोधात होत्या.