Home > Politics > राजू शेट्टी भाजपसोबत जाण्याची चर्चा, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रीया

राजू शेट्टी भाजपसोबत जाण्याची चर्चा, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रीया

राजू शेट्टी भाजपसोबत जाण्याची चर्चा, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रीया
X

पाच राज्यांच्या निवडणूकानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तर भाजपच्या काही धोरणांची स्तुती केली. त्यानंतर राजू शेट्टी भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे.

पाच राज्याच्या निवडणूकीनंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी वीजबीलासह भुमी अधिग्रहण कायद्यावरून राज्य सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे राजू शेट्टी हे पुन्हा भाजपवासी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

फडणवीस म्हणाले की, राजू शेट्टी हे आमचेच आहेत. मात्र काही कारणामुळे ते महाविकास आघाडीसोबत गेले होते. मात्र राजू शेट्टी यांच्याशी सध्या काहीही चर्चा झाली नाही. त्यामुळे ते भाजपसोबत येणार की नाही याबाबत सांगता येणार नाही. तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागच्या काळात जेवढे शेतकरी हिताचे निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतले. तेवढे कुणीच घेतले नाही. साखर कारखानदारी, ऊस उत्पादकांसाठी मोदीजींनी अनेक निर्णय झाले. त्यामुळे राजू शेट्टी यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्यांची भुमिका समजेल, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी सामना रंगला असतानाच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आघाडीची ऑफर दिली आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी आणि एमआयएम एकच असल्याचे सांगत एमआयएमने राष्ट्रवादी सोबत जाण्याचा सल्ला दिला आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले, भाजपला हरवण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे सगळे एकत्र आले तरी भारतातील जनता, महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे. त्यामुळे जनता भाजपला निवडून देते. पण राष्ट्रवादी आणि एमआयएम एकत्र झाले तर शिवसेना काय करणार याकडे आमचे लक्ष असणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना फडणवीस यांनी विरोधकांकडून ईव्हीएमवर उपस्थित प्रश्न उपस्थित केल्यावरही भाष्य केले. यावेळी फडणवीस म्हणाले की, ते हारले की त्यांना इव्हीएम दिसते. भाजपची बी टीम दिसते. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, असा टोला फडणवीस यांना लगावला.

एमआयएमने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला ऑफर दिल्याने आम्ही पाहतोय की शिवसेना काय भुमिका घेणार? कारण तसंही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे असं लिहीले आहे त्याबरोबरच शिवसेना अजानची स्पर्धा आयोजित करते. त्याचा परिणाम काय होतो ते पाहूयात असे फडणवीस यांनी म्हटले.

Updated : 19 March 2022 7:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top