Home > Politics > राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मिळणार का? अवघ्या राज्याचं लक्ष

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मिळणार का? अवघ्या राज्याचं लक्ष

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मिळणार का?  अवघ्या राज्याचं लक्ष
X

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकणी 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीची मुदत आज संपत आहे, त्यांना आज जामीन मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अनिल देशमुख सोमवारी ईडीसमोर हजर झाले होते. ईडीनं तब्बल 13 तास त्यांची चौकशी केली त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात चांदीवाल आयोगासमोर कोणतेही पुरावे द्यायचे नसल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे ईडीनं अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना गुरुवारी हजर होण्याचे समन्स दिले होते. मात्र, ते हजर झाले नाही. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता.

दरम्यान महाराष्ट्र सरकारकडून माजी न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करत अनिल देशमुख यांच्याविरोधात पुरावे सादर करणार नसल्याचं म्हटले आहे.

Updated : 6 Nov 2021 3:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top