Home > Politics > सुधीर तांबे यांचं वक्तव्य आणि भाजपची गोची...

सुधीर तांबे यांचं वक्तव्य आणि भाजपची गोची...

सुधीर तांबे यांचं वक्तव्य आणि भाजपची गोची...
X

''सत्यजित तांबे अथवा मी भाजपचा पाठिंबा मागितला नसून मागणार देखील नाही'' अशी प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी दिली आहे. तांबे आज निफाड येथे प्रचारासाठी आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.

नाशिक पदवीधर विधानपरिषद (Nashik Biennial Elections) निवडणूकीत काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना उमेदवारी दिली होती. मात्र डॉ. सुधीर तांबे यांनी सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यासाठी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. त्यामुळे काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे. त्याबाबत डॉ. सुधीर तांबे यांनी प्रतिक्रीया दिली. यावेळी काँग्रेसने माझ्यावर केलेली कारवाई ही न्यायाला धरून नाही, असं मत डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले. त्यानंतर आता भाजप सत्यजित तांबे यांना पाठींबा देणार अशी सर्वत्र चर्चा असताना सत्यजित तांबे अथवा मी भाजपचा पाठिंबा मागितला नसून मागणार देखील नाही अशी प्रतिकिया सुधीर तांबे यांनी दिली आहे.

सुधीर तांबे काल प्रचारासाठी निफाड या ठिकाणी आले असताना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले यावेळी बोलताना ते म्हणाले की, ''पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी काँग्रेस व अपक्षचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांना एबी फॉर्म मिळाला नसल्याने अपक्ष राहून निवडणूक लढवत असल्याने आमच्या पक्षश्रेष्ठीचा काहीतरी गैरसमज झाला असून आम्ही त्याबाबत त्यांच्यासोबत बसून चर्चा करणार असल्याचं देखील सुधीर तांबे यांनी म्हंटले आहे. तुम्ही भाजपचा पाठिंबा मागितला होता याबाबत विचारले असता यावेळी सुधीर तांबे म्हणाले की, आम्ही कोणत्याही प्रकारे भाजपचा पाठिंबा मागितला नसून व घेणार देखील नसल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार सुधीर तांबे यांनी दिली आहे.

Updated : 17 Jan 2023 5:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top