Home > Politics > ''बघत रहा, योग्य वेळी'' तांबेंच्या पाठींब्याबाबत फडणवीसांचे सूचक विधान..

''बघत रहा, योग्य वेळी'' तांबेंच्या पाठींब्याबाबत फडणवीसांचे सूचक विधान..

बघत रहा, योग्य वेळी तांबेंच्या पाठींब्याबाबत फडणवीसांचे सूचक विधान..
X

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर (nashik padvidhar) मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr. sudhir tambe) यांनी आपला मुलगा सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना पुढे केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सुधीर तांबे यांच्या ऐवजी सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आणि यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. या सगळ्या प्रकारानंतर खरंतर राज्याच्या राजकारणामध्ये एक ट्विस्ट निर्माण झाला. आता या निवडणुकीमध्ये आणखीन रंगात वाढणार आहे. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या शुभांगी पाटील (shubhangi patil) यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाने पाठिंबा दर्शवला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडी (maha vikas aghadi) साठी प्रतिष्ठेची ठरत आहे.

शिवसेनेने अपक्ष उमेदवार असलेल्या शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतर आता महाविकास आघाडी कडून शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता सत्यजित तांबे यांना भाजप (BJP) पाठिंबा देणार का? अशी सर्वत्र चर्चा आहे. काल भाजपचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुण्यात होते. यावेळी पत्रकारांसोबत बोलत असताना पत्रकारांनी त्यांना हाच प्रश्न विचारला आणि या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले ''बघत रहा, योग्य वेळी तुम्हाला सर्व गोष्टी स्पष्ट होतील'' असे सूचक विधान केले आहे.

Updated : 15 Jan 2023 4:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top