Home > Politics > ED समोर हजर होण्याबाबत अनिल देशमुख यांचे उत्तर

ED समोर हजर होण्याबाबत अनिल देशमुख यांचे उत्तर

ED समोर हजर होण्याबाबत अनिल देशमुख यांचे उत्तर
X

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता EDने जप्त केली आहे. पण ही मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेपैकी आपल्या मुलाच्या नावावर असलेल्या जमिनीची किंमत 2 कोटी 67 लाख असल्याचे ईडीनेच सांगितले आहे.

ED समोर हजर होण्याबाबत अनिल देशमुख यांचे उत्तरतरीही काही माध्यमे ही जागा 300 कोटींची असल्याचे दाखवत आहे, ते चुकीचे असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे. तसेच EDने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पण आपण सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेचा निकाल लागल्यानंतर आपण स्वत:हून ईडीसमोर हजर राहणार असल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Updated : 19 July 2021 9:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top