Home > Politics > अनिल देशमुख खडसे आज ईडी समोर?

अनिल देशमुख खडसे आज ईडी समोर?

अनिल देशमुख  खडसे आज ईडी समोर?
X

महाविकास आघाडी सरकारला ईडीची पीडा लागली असून आज माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना समोर चौकशीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

तिघांनाही सक्तवसुली संचालनालयाने समन्स पाठवले असून आज मुंबईमध्ये चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.पुणे भोसरी MIDC भूखंड खरेदी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसें यांना आज ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.विशेष म्हणजे ह्याच प्रकरणात खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाली आहे.एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसें ह्या उद्या हजर होणार का ? याकडे आता लक्ष लागून आहे.

एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसें जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन असलेल्या बँकेला ही ईडीने नोटीस काढली आहे, मुक्ताई साखर कारखाना कर्ज प्रकरणी ईडीला कर्ज प्रकरणातील कागदपत्र तपासायची आहेत आवश्यक ती कागदपत्र ईडी कार्यालयात सादर करण्याची नोटीसही जिल्हा बँकेला दिले आहेत.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कोणती कारवाई करणार याकडे आता लक्ष लागलंय. अनिल देशमुख यांना उद्या हजर राहण्यासाठी ईडीनं आणखी एक समन्स बजावलं आहे. ईडीनं अटक करू नये यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर दिलासा देण्यास न्यायालयानं नकार दिला होता. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांच्याविरोधात ईडी आता कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे.

सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून नेत्यांना टार्गेट करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याची यापूर्वीचे प्रयत्न असफल झाल्यानंतर आता पुन्हा एकदा ईडीची चौकशी वेगवान झाली असून ऑपरेशन लोटस पुन्हा ऍक्टिव्हेट होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 18 Aug 2021 3:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top