Home > Politics > स्व. बाळासाहेब ठाकरेंना पद्मविभूषण पुरस्कार का नाही? - खा. संजय राऊत

स्व. बाळासाहेब ठाकरेंना पद्मविभूषण पुरस्कार का नाही? - खा. संजय राऊत

स्व. बाळासाहेब ठाकरेंना पद्मविभूषण पुरस्कार का नाही? - खा. संजय राऊत
X

मुंबईसह महाराष्ट्रातील राजकारणावर ज्यांची पकड होती. ज्यांना भल्याभल्या राजकारण्यांना जेरीस आणले. आणि महाराष्ट्रात हिंदूचे अस्तित्व अबाधित ठेवण्याचा ज्यांनी वेळोवेळी प्रयत्न केला. त्या हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना पद्मविभूषण का देण्यात येवू नये, असा सवाल शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

मुलायम सिंह यादव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच्याबाबत आम्हाला आक्षेप नाही. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने राम मंदिर बाबत भूमिका घेतील होती, त्यावर आमचा आक्षेप आहे आणि विरोध आहे. तसे मुलायम सिंह यादव हे देशातील मोठे नेते होते. त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पूरस्कार देण्यात आला तर स्व. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पद्मविभूषण पुरस्कार का देण्यात येवू नये, असा सवाल शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित करुन राजकीय राजकारणात एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.

आयोध्येमध्ये हिंदू तरुणांवर गोळीबार करण्याचे आदेश मुलायम सिंह यादव दिले होते. त्यांचा आम्ही त्यावेळी सुद्धा निषेध केला होता. आणि आजही त्या घटनेचा आम्ही निषेध करतो. आणि त्यावेळी जे झाले त्याला मुलायम सिंह यादेव हे पूर्णपणे जबाबदार होते. असेही राऊत यांनी सांगितले. त्याबाबत आमचा मुलायम सिंग यादव यांना विरोध होता आणि कायम विरोध राहणार असल्याचे राऊत यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत सांगितले. त्यावेळी मुलायम सिंह यादव यांचा उल्लेख भाजपाने हत्यारा असा केला होता. हे पुरस्कार देताना किंवा यादी ठरवताना स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचार का केला गेला नाही ? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी बाबरी मस्जिद पाडल्यानंतर ठाकरे यांनी कडवट भूमिका घेतली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनात लावण्यात आले आहे. आणि त्यांच्या विचारांचे आम्ही वारसदार असल्याचे सांगून चालणार नाही. राष्ट्रीय स्तरावर बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान सध्याचे सरकार करत आहे का? हे पाहावे लागेल, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

त्याच सोबत संजय राऊत यांनी भाजपावर तोफ डागताना जेव्हा भाजपाच्या सोयीचे सर्वे असतात तेव्हा त्यांना हवे असतात, असे सांगितले. राष्ट्रीय सर्वे हा भाजपच्या बाजूने आहे. हा त्यांना हवा आहे मात्र महाराष्ट्रातला सर्वे त्यांच्या विरोधात आहे. म्हणून त्यांना तो नको आहे, अशी टिका राऊत यांनी यावेळी भाजपावर केली. त्या सर्वेनुसार भाजपाला राज्यातून लोकसभेच्या ३४ जागा मिळतील, असा अनुमान लावण्यात आला आहे. मात्र महाविकास आघाडीला साधारण ४० ते ४५ जागा मिळतील अशी आशा असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांना वाटतं ४-५ जागा मिळाल्या तरी पुरे आहे, मात्र माझा असं म्हणणं आहे की, त्यांनी कल्याण-डोंबिवलीची जागा वाचवली तरी त्यांना पुरे असल्याचा टोला राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी लगावला.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जे म्हणत आहे ते खरे असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. अजूनही महाविकास आघाडी म्हणून वंचित बहुजन आघाडीशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले. फक्त शिवसेना आणि वंचित या दोन पक्षांमध्येच चर्चा झालेली असल्याचे राऊत यांनी सांगितले. त्यामुळे शरद पवार जे बोलत आहेत ते बरोबर असल्याचे संजय राऊत यांचे म्हणणे आहे.

Updated : 28 Jan 2023 8:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top