Home > Politics > राहुल गांधींच्या या हत्यारापुढे पॅगासस जासूस फेल...

राहुल गांधींच्या या हत्यारापुढे पॅगासस जासूस फेल...

राहुल गांधींचं लफडं, भानगड, झेंगाट सापडलं का पॅगासस जासूसला ? देशभरात ज्या व्हायरसची दहशत पसरली असताना राहुल गांधी बिनधास्त कसे काय? जाणून घ्या श्रीनिक नराडे यांच्याकडून...

राहुल गांधींच्या या हत्यारापुढे पॅगासस जासूस फेल...
X

सरकारने पेगासस मार्फत काही लोकांवर पाळत ठेवली. साहजिक आहे राहूल गांधी यातून सुटले नसतील. पण जगातील सगळ्यात भारी तंत्रज्ञान वापरूनही राहूल गांधी यांचं लफडं, भानगड, झेंगाट वगैरे काही सापडलं नाही. भक्तांच्या मते भ्रष्टाचारी काँग्रेस ज्या ज्या राज्यात सत्तेत आहे. त्यांच्याकडून हप्तावसुली केलेली सापडली नाही.

राहूल गांधी यांचे मिम्स तयार करणे, डॉक्टरड व्हिडिओ तयार करणे, पप्पू पप्पू म्हणून रात्रंदिवस करोडो रूपयाचा खर्च करून आयटीसेलचे ओरडणे. यामागे राहूल यांची प्रामाणिकता कारणीभूत आहे. राहूल गांधी सर्वसामान्य लोकांत मिसळतात, खेळतात, पोहतात, संभाषणं करतात. तो जसा वरून दिसतो. तेवढाच स्वच्छ आणि निर्मळ तो आतूनही आहे. हे पेगासस ने पाळत ठेवूनही राहूल गांधी कुठे अडकला नाही. यावरून हेच सिद्धच होतं.

जेव्हा काहीच सापडलं नाही तेव्हा बैचेन होऊन आयटीसेल थेट राहूल गांधी यांच्या आईचा उद्धार करून शिव्या घालत होती. एवढ्या खालच्या पातळीला जाऊन खाजगी आयुष्यावर पाळत ठेवण्याचं तंत्रज्ञान ज्यांच्या हाती आहे. त्यांच्या निवडणूकीतील यशाचा त्यांना चाणक्य म्हणून सतत अपयशी ठरणाऱ्या राहूल गांधी यांना पप्पू वगैरे म्हणण्याचा अधिकार कुणाला नाही.

मुख्य न्यायमुर्ती लोक रस्त्यावर येऊन पत्रकार परिषद घेतात आणि नंतरून ते कुठेच दिसत नाहीत. साहजिकच त्यांच्याही गळ्याला पेगाससरूपी फास असणार. देशात आज महागाईने जनता होरपळतीय, तरी एक ब्र शब्द निघत नाही की आंदोलन होत नाही. या मागचं सर्वात मोठ्ठं हत्यार पेगाससच आहे. जो आंदोलन करेल त्याचं आयुष्य उद्धवस्त करण्याची ताकद या तंत्रज्ञानात आहे. जे आपल्याच कररूपी पैशातून आपला गळा दाबत आहेत.

राहूल गांधी परवा बोलताना बोलले की भित्रे लोक आपल्याला नको आहेत. जेजे निडर आहेत पण आपल्या काँग्रेस पक्षात नाहीत. त्यांना पक्षात घ्या आणि भित्र्यांना हाकलून द्या. हे वकत्व्य या पेगासस पार्श्वभूमीवरच बेतलेलं असावं. प्रामाणिकता आणि सत्य हे मोठ्ठं हत्यार आहे. जे राहूल गांधींजवळ आहे. राहूल गांधींचे लफडे, भ्रष्टाचार, अनैतिक काहीही नाही हे पेगाससने दाखवून दिले. एक दिवस हे भाजपचे चाणक्य रस्त्यांनी दगडं मारत हिंडताना फिरले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

Updated : 21 July 2021 11:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top