Home > Politics > पंतप्रधान मोदी यांची भेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळली...

पंतप्रधान मोदी यांची भेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळली...

पंतप्रधान मोदी यांची भेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळली...
X

देशाच्या कायदेमंत्रालयाची एक परिषद ३० एप्रिलला दिल्ली येथे पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेला सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेनंतर होणाऱ्या डिनरला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहणार आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणाऱ्या या डिनरकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार देखील उपस्थित राहणार नसल्याचं समजतंय. काय आहे संपुर्ण प्रकरण पाहा आमचे दिल्ली प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी घेतलेला आढावा

Updated : 29 April 2022 12:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top