Home > Politics > 'या' फोटोचं कारण आलं समोर, मोदी सरकारने दिली राकेश झुनझुनवाला यांच्या कंपनीला विमान सेवेला परवानगी

'या' फोटोचं कारण आलं समोर, मोदी सरकारने दिली राकेश झुनझुनवाला यांच्या कंपनीला विमान सेवेला परवानगी

या फोटोचं कारण आलं समोर, मोदी सरकारने दिली राकेश झुनझुनवाला यांच्या कंपनीला विमान सेवेला परवानगी
X

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये मोदी एका व्यक्ती समोर उभे आहेत आणि एक व्यक्ती खुर्चीवर बसला आहे. खुर्चीवर बसलेली ही व्यक्ती म्हणजे शेअर मार्केटमधील बिग बुल राकेश झुनझुनवाला.

आता तुम्ही म्हणाल जे मोदी व्यापार करणं सरकारचं काम नाही असं म्हणतात. त्या मोदींना एका शेअर मार्केटमधील एका व्यक्तीसमोर असं उभं राहण्याची काय गरज? आणि एका शेअर मार्केट एक्सपर्ट ने देखील मोदींना तरी का भेटावं? मात्र, राकेश झुनझुनवाला काही साधी व्यक्ती नाही.

राकेश झुनझुनवाला हे हजारो कोटींचे मालक आहेत. त्यांचे कुटुंब जवळपास 22,300 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहे. काही माध्यमांनी त्यांची संपत्ती 30 हजार कोटी पेक्षा अधिक असल्याचं म्हटलं आहे.

ज्या दिवशी मोदी यांनी त्यांच्या भेटीची माहिती दिली त्या दिवशी झुनझुनवाला यांच्या चुरगळलेल्या कपड्यावरून त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं होतं. आता तुम्ही म्हणाल या श्रीमंत व्यक्तीची भेट घेतली म्हणून काय झालं?

मोदी यांनी देशातील अनेक श्रीमंत उद्योगपतींची भेट घेत असतात. त्यात काय एवढं. मात्र, मोदी कोणा उद्योगपतींची अशीच भेट घेत नाही. या दोघांची भेट झाली आणि मोदी सरकारने राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअरला विमान सेवा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला.

एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड, जी भारतीय विमानचालन क्षेत्रात अकासा एअर या नावाने आता विमान सेवेत प्रवेश करत आहे, एका निवेदनात या संदर्भात माहिती दिली गेली आहे. कंपनीला भारताच्या नागरी उड्डयान मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यात आले आहे.

अकासा एअरने 2022 च्या उन्हाळ्यापासून विमान सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. अकासा एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे म्हणाले की, नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सहकार्यासाठी आणि एनओसीबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. एकंदरीतच या दोनही दिग्गज व्यक्तींची भेट अशीच झाली नव्हती. असंच या भेटीवरुन दिसून येतं.

Updated : 12 Oct 2021 1:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top