Home > Politics > Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत सहभागी का व्हावं?, डॉ. प्रतिभा शिंदे यांनी सांगितलं कारण

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत सहभागी का व्हावं?, डॉ. प्रतिभा शिंदे यांनी सांगितलं कारण

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत सहभागी का व्हावं?, डॉ. प्रतिभा शिंदे यांनी सांगितलं कारण
X

काँग्रेस (Congress) वगळता इतरही पक्षाचे, संघटनांचे, चळवळींचे लोक भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra) त का सहभागी होत आहेत? याबाबत डॉ. प्रतिभा शिंदे यांनी भूमिका मांडली आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) त काँग्रेस (Congress) वगळता, डाव्या पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विविध चळवळी व संघटना सहभागी होत आहेत. मात्र यामागे काय कारण आहे ते डॉ. प्रतिभा शिंदे (Dr. Pratibha Shinde) यांनी सांगितलं आहे.

डॉ. प्रतिभा शिंदे म्हणाल्या की, भारत इतिहासातील (indian History) एका कठीण मोडवर आहे. या देशात करुणा, मैत्री, शील आणि भारताचा धर्म धोक्यात आहे. या देशातील लोकतंत्र धोक्यात आहे. संविधान धोक्यात आहे आणि अशा काळात कोणी नफरत छोडो, भारत जोडो म्हणत आहे. त्यामुळे आम्ही या यात्रेत सहभागी होत आहोत.

या देशातील फॅसिझम (Fascism)संपलं पाहिजे. या देशातील दहशतवाद संपला पाहिजे. या देशातला जमातवाद संपला पाहिजे. क्रोनी कॅपिटलिजम (Croni Capitalism) आणि साम्राज्यवादी कंपन्यांचं संकट आपल्यावर येतंय. तसेच या देशातील अर्थव्यवस्था (Economy) मुठभरांच्या हातामध्ये जात आहे. कोरोनाच्या काळात या देशात 70 टक्के लोक गरीबीच्या खाईत जातात आणि एक अदानी (Adani) नावाचा माणूस जगात नंबर दोनच्या क्रमांकावर जातो. दोन वर्षात त्याची संपत्ती 16 टक्क्याने वाढते. 66 लाखांवरून 20 हजार करोड पर्यंत ती जाते, या वाढत्या विषमतेमुळे भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रतिभा शिंदे सांगतात.

पुढे बोलताना प्रतिभा शिंदे म्हणाल्या की, आपण जर बघितला तर ही विषमता होत आहे. ही विषमता सत्तेतील लोकांच्या आशिर्वादाने होत आहे. या देशात महिलांवरचे अन्याय (Crime Against woman), दलितांवरचे अन्याय (Crime Against Dalit) तसेच या देशात अल्पसंख्यांकावरचे अन्याय (Crime against minority) आणि आदिवासींवरचे अन्याय (Crime Against Tribal) हे या देशातील राजशक्तीच्या आशिर्वादाने नाही तर त्यांच्या सहभागाने होत आहेत. त्यामुळे त्याच्या विरोधात नागरी समाज आवाज उठवत आहे. तसेच जेव्हा भारत जोडो यात्रा निघते आहे. तेव्हा आपले अस्तित्व स्वतंत्र ठेवत, आपला झेंडा स्वतंत्र ठेवत, आपले नारे स्वतंत्र ठेवत भारत जोडोच्या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे, असंही नांदेड (Nanded) येथे डॉ. प्रतिभा शिंदे यांनी सांगितलं.

प्रतिभा शिंदे म्हणाल्या, आज जो जो कोणी या फॅसिझम आणि क्रोनी कॅपिटलिझमच्या विरोधात लढेल. त्याच्या सोबत आम्ही आहोत आणि म्हणून भारत जोडोच्या आम्ही सोबत आहोत. या भारत जोडो यात्रेसाठी विनोबा भावे यांच्या गागोदा पासून ते कोल्हापूर, आळंदी-देहू येथूनही लोक येतील, त्यांना संविधानाची प्रत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिभा शिंदे यांनी दिली.

Updated : 17 Oct 2022 8:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top