Home > Politics > #Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांची नाराजी का? ५ कारणं आली समोर

#Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांची नाराजी का? ५ कारणं आली समोर

#Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांची नाराजी का? ५ कारणं आली समोर
X

शिवसेनेचे सगळ्यात वजनदार मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackrey) यांच्याविरुद्ध बंड केल्याने राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी २२ आमदारांसह बंड केले आहे. आता ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पण आता एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचे कारण काय अशी चर्चा असताना त्यांच्या जवळच्या सहकाऱ्याने एकनाथ शिंदे यांच्या मनातील खदखद काय होती याची माहिती दिली आहे. आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले की मुळात शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्यास एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांचा विरोध होता.

सेनेच्या आमदारांची नाराजी का?

१. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्यास अनेक आमदारांचा विरोध

२. आदित्य ठाकरे यांचा ज्येष्ठ मंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप

३. संजय राऊत, अनिल परब, अनिल देसाई या नेत्यांना जनाधार नाही, तरीही पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत महत्व

४. महामंडळांवरील नियुक्त्या नाही, मंत्रिमंडळ विस्ताराच्या मागणीकडे दुर्लक्ष

५. शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नसल्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष

Updated : 21 Jun 2022 8:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top