Home > Politics > संजय राऊतांनंतर कुणाचा नंबर, नितेश राणेंने सूचक ट्विट

संजय राऊतांनंतर कुणाचा नंबर, नितेश राणेंने सूचक ट्विट

संजय राऊतांनंतर कुणाचा नंबर, नितेश राणेंने सूचक ट्विट
X

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना EDने अटक केली आहे. त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. संजय राऊत यांच्यानंतर शिवसेनेच्या कोणत्या नेत्यावर कारवाई होणार अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी आता याबाबत संकेत देण्यास सुरुवात केली आहे. संजय राऊत यांनी आगे आगे देखो होता है क्या असे म्हणत पुढे आणखी नेत्यांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले आहे.

संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळा, स्वप्ना पाटकर नावाच्या महिलेशी गैरवर्तन, किरीट सोमय्या याच्या पत्नीच्या मानहानी प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. पुढे किती गुन्हे दाखल होणार हे तपास यंत्रणाच सांगू शकतील, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन आता माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अनिल परब यांचा नंबर असल्याचे म्हटले आहे. त्यांनी its time असे म्हणत अनिल परब यांचा फोटो ट्विट केला आहे. अनिल परब यांची याआधी अवैध रिसॉर्ट प्रकरणी एकदा ED चौकशी झाली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्यानंतर ED अनिल परब यांना ताब्यात घेणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.


Updated : 1 Aug 2022 8:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top