Home > Politics > #Bharatjodo 2024 च्या निवडणुकीत "भारत जोडो" चा परिणाम होणार : जयराम रमेश

#Bharatjodo 2024 च्या निवडणुकीत "भारत जोडो" चा परिणाम होणार : जयराम रमेश

#Bharatjodo 2024 च्या निवडणुकीत भारत जोडो चा परिणाम होणार : जयराम रमेश
X

भारत जोडो यात्रेचा आज ६९ वा दिवस याचं पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे महिलांचा, या यात्रेत महिला माठ्या प्रमाणात सहभागी झाल्या असल्याने महिलांमुळे यात्रेला सकारात्मकता मिळाली. असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच बरोबर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांनी देखील यात्रेबदद्ल अनुभव सांगितला.

यशोमती ठाकूर काय म्हणाले "भारत जोडो यात्रेत मी एका वयवृद्धाला विचारे तुम्ही ७० वर्षाचे आहात तरी तुम्ही का चालताय तेव्हा मला म्हणाले राहुल गांधी चालू शकतात आणि आम्ही घरात झोपा काढू शकत नाही, पुरागामी महाराष्ट्रातील आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत त्यांच्या विचारांची व्यापकता, सकारात्मकता, पसरवण्याचे काम आम्ही करत आहोत. हीच गोष्ट आम्ही आता राहुल गांधी यांच्याकडून शिकत आहोत."

निवडणूकीच्या प्रश्नांबद्दल जयराम रमेश यांनी पुढील प्रमाणे भूमिका मांडली गेल्या निवडणूकीत विदर्भातून हव तस यश काँग्रेसला मिळाले नाही. त्यामुळे 2024 काय होणार या पत्रकारांच्या प्रश्नांवर जयराम रमेश म्हणाले. "भारत जोडो यात्रा निवडणूकीचा विषय नाही. तो सामाजिक विषय आहे. आपण भारत जोडो यात्रेबद्दल बोलतोय निवडणूकीबद्दल नाही. निवडणूक येथील जातील आम्ही हारु आणि जिंकू सुद्धा. विदर्भ हा 'काँग्रेस'चा नेहमीच गड राहिलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक हे देखील याच मतदार संघातले होते. आम्ही गेल्या निवडणूकीत ३५ ते ४० टक्क्यांनी हरलोय आमचे सगळेच मतदार इथलेच आहेत. तसेच जयराम रमेश निवडणूकीबद्दल आणखीन काय म्हणालेत पाहुयात या व्हिडिओच्या माध्यामातून.

Updated : 15 Nov 2022 12:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top