Home > Politics > मुख्यमंत्री आपल्या भाषणातून अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांना काय म्हणाले?

मुख्यमंत्री आपल्या भाषणातून अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांना काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली. तसेच एकनाथ शिंदे यांनी हिंदी भाषेचा वापर करत उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता, इशारा दिला.

मुख्यमंत्री आपल्या भाषणातून अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांना काय म्हणाले?
X

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत भाषण करताना अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली. ठाकरे सरकारच्या काळात अजित पवार यांनी गेल्या अडीच वर्षात फक्त एकच सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली. पण आमचं सरकार आल्यानंतर सहा महिन्यात १८ सिंचन प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली. तसेच एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली येथे खनिजावर ऊर्जा निर्माण करणारा प्रकल्प सुरु करणारा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांना काही सुचना करायचा असतील तर ते करु शकतात.

असे शिंदे यांनी आपल्या भाषणातून मत व्यक्त केले. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी एकनाथ शिंदे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करताना पुढे म्हणाले की. शेतकऱ्यांना मोबादला मिळावा यासाठी त्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी घेण्यात येतील. तसेच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावरती टीका केली. तुम्ही आमचे पन्नास वर्षापूर्वीच्या सगळ्या गोष्टी काढत आहात. पण आम्ही तुमचं पाठीमागचं काहिच काढत नाही. पण माणसाने एकदा आत्मक्लेश केला तर तो माणूस चुक पुन्हा करत नाही,

असा टोला शिंदे यांनी ठाकरे यांच्यावरती लगावला. तसेच एकनाथ शिंदे यांनी हिंदी भाषेचा वापर करत पुढे म्हणाले की, मै खामोश हूँ, लेकीन मै सब जानता हूँ, बात निकलेगी तो दूर तक जायेगी. असा इशारा शिंदे यांनी ठाकरे यांना दिला. तसेच हे शिंदे-फडणवीस सरकार एक महिन्यात पडेल, सहा महिन्यात पडेल, असे अंदाज लावायाचे. पण शेवटच्या क्षणा पर्यंत हे सरकार टिकेल, अशी ग्वाही शिंदे यांनी आपल्या भाषणातून दिली.

Updated : 30 Dec 2022 12:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top