Home > Politics > सुषमा अंधारे विरोधात आंदोलन करणारे वारकरी संप्रदाय नेमके कुणाचे?

सुषमा अंधारे विरोधात आंदोलन करणारे वारकरी संप्रदाय नेमके कुणाचे?

सुषमा अंधारे विरोधात आंदोलन करणारे वारकरी संप्रदाय नेमके कुणाचे?
X

शिवसेना ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांबद्दल वापरलेला अपशब्दांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता. सुषमा अंधारे यांच्याविरोधात महाराष्ट्रातील अनेक वारकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन 'माफी मांगो' आदोलन देखील केले होते. फडणवीस यांनी राज्यपाल हटाव 'या' महाराष्ट्राच्या जनतेच्या भूमिकेवर राज्यपालांना वाचवण्यासाठी आणि सरकारच्या इतर भ्रष्ट कारभार लपण्यासाठी प्रयत्न केले.

माझी वारकऱ्यांबद्दलची जुनी क्लिप पंधरा वर्षानंतर व्हायरल करण्यात आली असे आरोप सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केले आहेत. महाराष्ट्रभर आंदोलन करणारे वारकरी हे सांप्रदायिक नसून ते मोहन भागवत समर्थक गट आहे. अंधारेंच्या या टीकेवर मोहन भागवत यांनी अद्यापही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत मी चार वर्षाचे बाळ मी निश्चितच असू शकते, पण चार वर्षाचं बाळ सळो की पळो करत असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी विचार करावा की, ठाकरे गटातील शिवसैनिकांच्या मनात तुमच्याबदद्ल किती राग असेल, असं मत देखील सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं.

Updated : 25 Dec 2022 9:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top