Home > Politics > Raj Thackeray vs Uddhav Thackeray : राज आणि उद्धव यांची युती न होण्याची काय आहेत कारणे?

Raj Thackeray vs Uddhav Thackeray : राज आणि उद्धव यांची युती न होण्याची काय आहेत कारणे?

आगामी मुंबई महानगर पालिका निवडणूकीत पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होण्याची शक्यतांना राज्याच्या राजकारणात पेव फुटले आहे. या निवडणूकीत हे दोघे ठाकरे बंधू एकत्र येणार का? असा प्रश्न राज्यातील जनता विचारत आहे. मात्र दरवेळी ही युती न होण्याची कोणती कारणे असे शकतात, याचा घेतलेला हा आढावा.

Raj Thackeray vs Uddhav Thackeray :  राज आणि उद्धव यांची युती न होण्याची काय आहेत कारणे?
X

राज्यात कोणतीही निवडणूक जाहीर झाली तर त्या निवडणूकीपूर्वी दोन ठाकरे बंधूची चर्चा होते. एक आहेत उद्धव ठाकरे आणि दुसरे आहेत राज ठाकरे...हे कधीही कोणत्याही निवडणुकीत एकत्र आले नाहीत. आणि राज्यातील कोणतीही अशी निवडणूक नाही, जिथे ठाकरे बंधूची चर्चा होत नाही. मात्र आता पुन्हा एकदा मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच पार पडणार आहे. त्या निवडणूकीत तरी ठाकरे बंधू एकत्र येणार का? असा प्रश्न मतदारराजा विचारत आहे. हे दोन बंधू एकत्र यावेत, यासाठी याअगोदर सुद्धा अनेक प्रयत्न झाले आहेत. मात्र हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. मनसेचे नेते युतीचा प्रस्ताव घेवून अनेकदा मातोश्रीवर सुद्धा गेले आहेत. मात्र ही युती आजपर्यत कोणत्याही निवडणूकीत होवू शकलेली नाही.

ही युती न होण्याची अनेक कारणे आहेत. मात्र त्यातील प्रमुख कारण म्हणजे दोघांमधील असलेला ईगो हा मोठा प्रॉब्लेम आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळच्या दोन नातेसंबंधातील व्यक्तींनी ही युती व्हावी यासाठी खुप प्रयत्न केला होता. मात्र राज ठाकरे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांना मोलाचा सल्ला दिली होता की, मातोश्रीवर युतीबाबत चर्चा करण्यासाठी न जाता फोनवर पहिल्यांदा चर्चा करा. संदीप देशपांडे यांनी तसे न करता संतोष धुरी यांनी घेवून ते थेट मातोश्रीमध्ये दाखल झाले. तेथे उद्धव ठाकरे आणि संतोष धुरी व संदीप देशपांडे यांची चर्चा झाली. मात्र या चर्चेला मुर्त स्वरुप येवूच शकले नाही.

या भेटीमध्ये उद्धव यांनी देशपांडे यांना २६ जानेवारी रोजी आमची एक युती तुटणार असल्याचे सांगितले आणि ही युती तुटली की, आपण तुमच्यासोबतच्या युतीचा विचार करू, असा सल्ला दिला. त्याचसोबत संदिपला सवाल केला की, तुझा प्रभाग सुद्धा आम्हाला हवा आहे. त्यावर देशपांडे यांनी राजसाहेब जे म्हणतील ते करण्यासाठी मी तयार असल्याचे सांगितले आणि माझे टेन्शन घेवू नका. पण ही युती झाली पाहिजे, यासाठी मी इथे आलो असल्याचे देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यानंतर काही दिवसात युती तुटल्याची घोषणा झाली. आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून जी व्यक्ती भेटायला यायची त्या व्यक्तीने राज यांचे फोन घेणेचं बंद केले.

त्यावर संदीप देशपांडे यांनी याबाबत राज ठाकरे यांना विचारले असता, राज ठाकरे यांनी याचे उत्तर देत संदीपला सांगितले, उद्धव ठाकरे यांना शंका होती की, आपण भाजपासोबत युती करु, म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडून हा डाव खेळण्यात आला होता. मात्र मनसे तसेही भाजपासोबत जाणार नव्हतीच...मग खटाटोप कशासाठी करण्यात आला. याचे उत्तर अद्यापही मिळालेले नाही. आणि आजही ही युती होवू शकलेली नाही. या सर्व घडामोडीनंतर संदीप देशपांडे यांनी त्यात काही अर्थ नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे हे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. अशी प्रतिक्रीया दिली. त्यामुळे आगामी काळात किंवा मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूची युती होण्याची शक्यता धूसर आहे.

Updated : 22 Feb 2023 7:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top