Home > Politics > Eknath Shinde यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय कुणाचा? देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

Eknath Shinde यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय कुणाचा? देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

Eknath Shinde यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय कुणाचा? देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा
X

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनण्याची चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे बनले? एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यामागे कुणाचा निर्णय महत्वाचा होता? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे.

राज्यात झालेल्या सत्तानाट्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) मुख्यमंत्री होतील अशी चर्चा असतानाच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री बनतील, अशी घोषणा करण्यात आली. मात्र एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय नेमका कुणाचा? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. ते इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री पदाबाबतच्या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यावेळी घडणाऱ्या घटना T-20 मॅचप्रमाणे घडत होत्या. पण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय पुर्णपणे माझ्या सल्ल्याने आणि संमतीने झाल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळाल्याची गोष्टही सांगितली. यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यावेळी मला उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याची गळ वरिष्ठांनी घातली. त्यानंतर शपथ घेतानाही माझ्या डोक्यात अनेक विचार सुरू होते. मात्र तो निर्णय पक्षहिताच्या दृष्टीने महत्वाचा होता. त्यावेळी मी नाराज होतो. मात्र मी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर देशभरातून मला जे समर्थन मिळाले ते मुख्यमंत्री बनल्यानंतरही मिळाले नसते. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांनी मी उपमुख्यमंत्री असल्याचं कधीही जाणवू दिलं नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Updated : 2022-11-06T13:34:00+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top