Home > Politics > आजी-माजी मुख्यमंत्र्यांची खडाजंगी, कोण कुणामुळे सडलं आणि पडलं?

आजी-माजी मुख्यमंत्र्यांची खडाजंगी, कोण कुणामुळे सडलं आणि पडलं?

आजी-माजी मुख्यमंत्र्यांची खडाजंगी, कोण कुणामुळे सडलं आणि पडलं?
X

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या भाषणात भाजपवर पुन्हा एकदा घणाघात केला. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेने घायाळ झालेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले आहे. शिवसेना युतीमध्ये २५ वर्षे सडली याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला होता. त्याला उत्तर देताना २५ वर्षे युती सडली असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे असेल तर बाळासाहेब ठाकरे यांनी युती सडवली असे त्यांना म्हणायचे आहे का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. बाबरी मशीद पाडल्याचा दावा शिवसेना करते पण प्रत्यक्षात सहभाग हा भाजपच्या कार्यकर्त्यांचा होता, शिवसेनेने फक्त तोंडाच्या वाफा दवडल्या, या शब्दात फडणवीस यांनी टीका केली आहे. ज्यावेळी शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता तेव्हा मुंबईत भाजपचा नगरसेवक होता आणि आमदारसुद्धा होते असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. तर बाबरी मशीद विध्वसानंतर देशभरात शिवसेनेची लाट होती, तेव्हाच शिवसेनेचा पंतप्रधान होऊ शकला असता असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी १९९३ मध्ये शिवसेनेने उ. प्रदेशात १८० उमेदवार उभे केले होते, पण त्यांच्या १७९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते, असा दावा करत शिवसेनेला उत्तर दिले आहे.

Updated : 24 Jan 2022 11:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top