Home > Politics > फडणवीसांच्या काळात अडगळीत गेलेल्या २ नेत्यांचे पक्षाकडून पुनर्वसन

फडणवीसांच्या काळात अडगळीत गेलेल्या २ नेत्यांचे पक्षाकडून पुनर्वसन

फडणवीसांच्या काळात अडगळीत गेलेल्या २ नेत्यांचे पक्षाकडून पुनर्वसन
X


देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांना डावलून त्यांना अडगळीत टाकण्यात आले होते. यामध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश होता. पण आता गेल्या काही दिवसात डावलल्या गेलेल्या नेत्यांना भाजपने पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात सामावून घेण्यास सुरूवात केल्याचे दिसते आहे. भाजपचे राज्यातील नेते विनोद तावडे यांना भाजपने राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी दिली आहे. तावडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमोद महाजन यांच्यानंतर या पदावर नियुक्ती झालेले विनोद तावडे हे राज्यातील केवळ दुसरे नेते ठरले आहेत.विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली गेल्यानंतर विनोद तावडे सक्रीय राजकारणापासून दूर गेल्याचे चित्र होते. पण आता त्यांना पक्षाने राष्ट्रीय स्तरावर महत्वाचे स्थान दिले आहे. तावडे हे संघाच्या मुशीत तयार झालेल्या भाजप नेत्यांपैकी एक आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट कापलेल्या नेत्यांमध्ये बावनकुळे आणि विनोद तावडे यांचा समावेश होता. पण आता प७ने दोन्ही नेत्यांचे पुर्नवसन केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानपरिषदचे तिकीट देण्यात आले आहे. तर रविवारी विनोद तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आले आहे. तावडे यांना याआधी पक्षाने राष्ट्रीय मंत्री म्हणून पक्ष संघटनेत घेतले होते, आता त्यानंतर त्यांची बढती करत मोठे स्थान दिले आहे.

Updated : 21 Nov 2021 10:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top