Home > Max Political > 'दोन गुजराती देश विकत आहे आणि दोघे खरेदी करत आहेत'

'दोन गुजराती देश विकत आहे आणि दोघे खरेदी करत आहेत'

दोन गुजराती देश विकत आहे आणि दोघे खरेदी करत आहेत असं म्हणत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारला टोला हाणला आहे.

दोन गुजराती देश विकत आहे आणि दोघे खरेदी करत आहेत
X

यवतमाळ : दोन गुजराती देश विकत आहे आणि दोघे खरेदी करत आहेत असं म्हणत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारला टोला मारला आहे. ते यवतमाळ येथे बोलत होते.

काँग्रेस नेतृत्वाला दूरदृष्टी होती. त्यांच्या काळात देशाचा विकास झाला. बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. मात्र आज देश उलट्या दिशेने वाटचाल करत आहे. असं वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.

आज संपुर्ण देश केवळ चार गुजराती लोकांच्या हातात देश गेला आहे. असं म्हणत दोन गुजराती देश विकत आहे आणि दोघे खरेदी करत आहेत, असा घणाघाती टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारला लगावला.

देशातील मोठं मोठ्या सरकारी विभागाचे सुरू असलेले खासगीकरण चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.त्यामुळे अप्रत्यक्षरित्या देशाची सत्ता केवळ काही मोजक्या लोकांच्या हाती दिली जाईल.आणि येत्या काळात हे देशासाठी घातक ठरेल.

Updated : 10 Aug 2021 2:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top