Home > Politics > Vande mataram : वंदे मातरम् नाही म्हणलं तर तुरूंगात टाकणार का? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

Vande mataram : वंदे मातरम् नाही म्हणलं तर तुरूंगात टाकणार का? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

शिंदे-फडणवीस सरकारमधील नवनिर्वाचित सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पदभार स्वीकरताच सरकारी कर्मचाऱ्यांनी हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याचे आदेश दिले. त्यावरून वाद रंगला आहे. तर यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

Vande mataram : वंदे मातरम् नाही म्हणलं तर तुरूंगात टाकणार का? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
X

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मंत्रीमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप केली. मात्र यानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी फोन उचलल्यानंतर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याचे आदेश दिले. त्यावर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वंदे मातरम म्हणलं नाही तर तुरूंगात टाकणार का? असा सवाल केला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याचा गळा आवळू नका, असं म्हणत लोकांनी काय खावं, काय घालावं आणि काय बोलाव हे तुम्ही ठरवणार का? असा थेट सवालच जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसंच वंदे मातरम् नाही म्हणलं तर तुम्ही एखाद्याला तुरूंगात टाकणार का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

त्याला सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शब्दांचा योग्य अर्थ काढू काढण्याची क्षमता आपण विकसित करू शकलो नाही. हाच आपल्या शिक्षण व्यवस्थेतील दोष असल्याचा खोचक टोला लगावला.

तसंच मुनगंटीवार म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीला कायदा करून आम्ही तुरूंगात टाकू, असं म्हटलेलं नाही. मात्र वंदे मातरम् ला विरोध करणे म्हणजे संविधनाला विरोध करण्यासारखे आहे, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Updated : 16 Aug 2022 9:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top