Home > Politics > Uttarakhand Election: भाजपचे बरखास्त मंत्री म्हणाले काँग्रेसचेच सरकार येणार...

Uttarakhand Election: भाजपचे बरखास्त मंत्री म्हणाले काँग्रेसचेच सरकार येणार...

Uttarakhand Election: भाजपचे बरखास्त मंत्री म्हणाले काँग्रेसचेच सरकार येणार...
X

निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंगच प्रमाण अधिक असल्याचं गेल्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळालं होतं. मात्र, पाच राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकांमध्ये भाजपमधून इतर पक्षांमध्ये जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. उत्तराखंडमध्ये सध्या पुष्कर सिंग धामी यांच्या नेतृत्वात भाजपचं सरकार आहे. भाजपच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या हरक सिंह रावत यांना धामी यांनी मंत्रिमंडळातून बरखास्त केलं आहे.

काही दिवसांपूर्वी हरक सिंह रावत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, तेव्हा मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. अशावेळी भाजपने त्यांची समजूत काढली होती. मात्र, अखेर हरक सिंह रावत यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.

राजीनाम्याचं कारण काय?

असं सांगितलं जात आहे की, हरक सिंह रावत यांच्या सुनेला तिकीट हवं होतं. हे तिकीट देण्यास भाजपने नकार दिला म्हणून हरक सिंह नाराज होते. हरक सिंह रावत यांनी फक्त आपल्या सुनेलाचं नाही तर काही समर्थकांना देखील भाजप कडून तिकीट मागितले होते. मात्र, तिकीट देण्यास भाजप नेतृत्वाने नकार दिल्यानं त्यांनी हे पाऊल उचललं आहे.

पक्ष सोडल्यानंतर काय म्हणाले हरक सिंह...

"राज्यात काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात मी कष्ट करणार आहे. भाजपमध्ये अहंकार आला आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसचं बहुमताचं सरकार येणार आहे."

कोण आहे हरक सिंह रावत...? Who is harak Singh Rawat

हरक सिंह रावत हे उत्तराखंड प्रदेशाध्यक्ष गणेश गोंदियाल यांचे भाऊ असून त्यांनी 2000 सालामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. उत्तराखंडमधील गडवाल क्षेत्रात त्यांचं मोठं वर्चस्व आहे. अविभाजित उत्तर प्रदेश सरकारमध्ये देखील ते मंत्री राहिलेले आहेत.

उत्तराखंडमध्ये दोन नेत्यांनी या अगोदर भाजपला रामराम ठोकलेला आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले आणि कॅबिनेट मंत्री राहिलेले यशपाल आर्य आणि त्यांचा मुलगा संजीव आर्य यांनी भाजपला निवडणुकीच्या तोंडावर राम राम ठोकला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उत्तराखंड मध्ये भाजपच्या अडचणीत वाढ होत आहे.

काय आहे उत्तराखंडची परिस्थिती...?

७० जागांच्या उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ २३ मार्च रोजी संपत आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ५७ जागा जिंकून प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले, तर विरोधी काँग्रेसला केवळ ११ जागा मिळाल्या. त्रिवेंद्रसिंग रावत मुख्यमंत्री झाले, मात्र, त्यांना चार वर्षांतच काढत भाजपने पहिल्यांदा तीरथसिंग रावत आणि त्यानंतर काही महिन्यांनी पुष्कर सिंह धामी यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री केले.

Updated : 17 Jan 2022 5:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top