Home > Politics > मुस्लीम रिक्षा चालकाला बजरंग दलातील लोकांनी केली मारहाण

मुस्लीम रिक्षा चालकाला बजरंग दलातील लोकांनी केली मारहाण

वडिलांना पकडून मुलगी रडत राहिली, बजरंग दलाच्या लोकांनी 'जय श्रीराम' चे नारे देत, मुस्लीम रिक्षा चालकाला केली बेदम मारहाण... Up muslim man assaulted forced to chant jai shri ram slogans in kanpur

मुस्लीम रिक्षा चालकाला बजरंग दलातील लोकांनी केली मारहाण
X

उत्‍तर प्रदेश च्या कानपुर मध्ये काही लोकांनी मुस्लिम रिक्षावाल्याला मारत त्याची 'जयश्री राम' च्या घोषणा देत मिरवणूक काढली आहे.

कानपुर च्या एका वस्‍ती मध्ये दोन शेजाऱ्यांची भांडण झाली होती. कुरैशा आणि रानी परिवारांमध्ये झालेल्या वादाने सामाजिक वातावरण ढवलून निघालं आहे. कुरेशा परिवाराच्या मते मोटारसायकल घरासमोर लावल्याने वाद झाला होता. यामध्ये कुरैशा ने रानी वर मारहाण केल्याचा आरोप केला तर रानी ने कुरैशा च्या मुलांनी छेड काढल्याचा आरोप केला.

त्यानंतर या प्रकरणात बजरंग दलाने एन्ट्री घेतली आणि कुरैशा चा दीराची (देवर) मारहाण मिरवणूक काढली. या प्रकरणात आपल्या वडिलांना मारु नका. म्हणून छोटी मुलगी मध्ये आली. मात्र, जय श्रीराम चे नारे देणाऱ्या बजरंग दलाच्या लोकांना तिची दया आली नाही.

हल्ला करणारे लोक कुरैशा बेगम च्या घरी त्यांच्या मुलाला पकडण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी त्यांची मुलं घरी नव्हती. मात्र, रस्त्यात दीर (देवर) भेटला. तर त्यांना मारहाण करण्यात आली. घटनेच्या अगोदर बजरंग दलाने या ठिकाणी एक सभा देखील घेतली होती.

कानपुरचे बजरंग दलाचे जिल्हा संयोजक दिलीप सिंह बजरंगी ने या संदर्भात माध्यमांशी बातचीत करताना, 'आम्ही हिंदू समाजाला नुकसान पोहोचू देणार नाही. आम्ही आमच्या सनातन धर्माला वाचवण्यात समर्थ आहोत. जर आमचा हिंदू परिवार कोणत्याही कारणाने त्रस्त असेल तर आम्ही ढाल बनून उभे राहू.

दरम्यान, पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या व्यक्तींचा FIR दाखल केला आहे. तितक्यात रानी ने कोणाच्यातरी सल्ल्याने बजरंग दलाच्या लोकांशी संवाद साधला. त्यानंतर बजरंग दलातील लोकांनी वस्तीवर एक सभा घेतली.

कुरैशा च्या मते दरवाजात गाडी लावण्याच्या मुद्द्यावरुन सुरु झालेल्या वादाला हिंदू मुस्लीमचा रंग दिला जात आहे.

पोलिसांनी वेळेवर पोहोचून अफसार (ज्याला मारहाण झाली) त्याचा जीव वाचवला. तसंच ज्यांनी मारहाण केली. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कानपुर साउथ विभागाच्या पोलिस अधिकारी रवीना त्‍यागी यांनी सांगितलं 'या संदर्भात पीडित लोकांनी दिलेल्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहे. या संदर्भात NDTV ने वृत्त दिलं आहे.

Updated : 2021-08-13T11:18:38+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top