Home > Politics > राशनच्या पॅकेट वरून मोदी, योगी यांच्या फोटोसह "सोच इमानदार काम दमदार" हटवलं जाणार...

राशनच्या पॅकेट वरून मोदी, योगी यांच्या फोटोसह "सोच इमानदार काम दमदार" हटवलं जाणार...

राशनच्या पॅकेट वरून मोदी, योगी यांच्या फोटोसह सोच इमानदार काम दमदार हटवलं जाणार...
X

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा केल्यानंतर या पाच राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. येत्या काळात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणीपूर, गोवा राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान अनेक ठिकाणी आचारसंहितेचे उल्लंघन होतांना दिसत आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 साठी निवडणूक आयोगाद्वारे शनिवारी, 8 जानेवारीला अधिसूचना जारी करण्यात आली. निवडणुकीची घोषणा होताच सरकारी सामग्रीवरील प्रचार आणि प्रसार न करण्याच्या दृष्टीने राशन सामग्री वरील मोदी आणि योगी यांचे फोटो हटवण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहे.





अन्न व पुरवठा विभागाचे आयुक्त सौरभ बाबू यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी. ओमहरी उपाध्याय यांना याबद्दल पत्र ही लिहिली. ज्यामध्ये, राशन, हरभरा, रिफाइंड तेल यांसारख्या सर्व सामग्री वाटप करतांना त्यावरील मोदी आणि योगीचे फोटो तसेच मजकुर "सोच इमानदार काम दमदार" हटवून राशन वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे उत्तर प्रदेश मध्ये मोदी - योगी यांचे फोटो असलेले राशन वाटप केल्यास आचारसंहितेचे उल्लंघन कलमांअंतर्गत कारवाई केली जाणार आहे तसेच दुकाने देखील सील केली जाणार आहेत.

या अगोदर निवडणूक असलेल्या या 5 राज्यांमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो देखील हटवण्यात आला होता. आणि आता उत्तर प्रदेश मधील राशन सामग्री वरील मोदी आणि योगी यांचा फोटो हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.





उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ १४ मे २०२२ रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत १४ मे पूर्वी विधानसभा आणि नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

उत्तर प्रदेशात विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये झाल्या. भाजप ३१२ जागा जिंकून सत्तेवर आला. सपा ४७, बसप १९ आणि कॅांग्रेसला ७ जागा मिळाल्या.

भाजपचे योगी आदित्यनाथ यांनी १९ मार्च २०१७ रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सीएम योगी हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.

Updated : 11 Jan 2022 10:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top