Home > Politics > UP Election: सत्तेत आल्यावर मुलींना स्मार्ट फोन आणि इलेक्ट्रॉनिक स्कूटी देणार, प्रियंका गांधींची घोषणा

UP Election: सत्तेत आल्यावर मुलींना स्मार्ट फोन आणि इलेक्ट्रॉनिक स्कूटी देणार, प्रियंका गांधींची घोषणा

UP Election: सत्तेत आल्यावर मुलींना स्मार्ट फोन आणि इलेक्ट्रॉनिक स्कूटी देणार, प्रियंका गांधींची घोषणा
X

सध्या उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरु आहे. नुकतंच प्रियंका गांधी यांनी काँग्रेस येणाऱ्या निवडणुकांमध्ये ४० टक्के महिलांना उमेदवारी देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

त्यांच्या 'लडकी हूँ... लड सकती हूँ' या घोषणेनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं असतानाच आता प्रियंका गांधी यांनी शालेय मुलींसाठी आणखी एक घोषणा केली आहे.

सध्या प्रियंका उत्तर प्रदेशातील अनेक गावांना भेट देत आहे. या दरम्यान त्या शाळेतील विद्यार्थींना भेटल्या असता मुलींना त्यांच्यासोबत सेल्फी घ्यावयाचा होता. मात्र, मुलींकडे स्मार्टफोन नसल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांनी मुलींना विचारलं तुम्हाला मोबाईल हवा का? तेव्हा मुली म्हणाल्या सुरक्षितेसाठी मोबाईल हवा आहे. त्यावर प्रियंका गांधी यांनी मोबाईल देण्याची हमी त्यांना दिली. यावर ट्विट करत त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर मुलींना स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक स्कूटर दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे.

प्रियंका गांधी यांनी ट्विट मध्ये काय म्हटलं?

दरम्यान लडकी हूँ लड सकती हूँ यासंदर्भात युपी फक्त सुरुवात आहे असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. काय म्हटलं राहुल गांधी यांनी…

दरम्यान प्रियंका गांधी यांच्या या घोषणेचे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे.

Updated : 21 Oct 2021 9:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top