News Update
Home > Politics > जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत एकनाथ खडसेंची बिनविरोध निवड निश्चित

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत एकनाथ खडसेंची बिनविरोध निवड निश्चित

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत एकनाथ खडसेंची बिनविरोध निवड निश्चित
X

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत (Jalgaon District Bank Elections) भाजपला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत छाननीत बाद झालेल्या भाजप उमेदवारांच्या हरकती विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावल्या आहेत. माजी आमदार स्मिता वाघ , मुक्ताईनगर येथील नाना पाटील , माधुरी अत्तरदे या तिघांसह अन्य चार जणांच्या हरकती विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावल्या आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननी प्रक्रियेत भाजपच्या स्मिता वाघ, नाना पाटील, माधुरी अत्तरदे, भारती चौधरी यांच्यासह खासदार रक्षा खडसे यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अवैध ठरवण्यात आले होते.

त्यानंतर भाजपच्या उमेदवारांनी त्यावर आक्षेप घेतला होता आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. यावर मंगळवार कामकाज झालं होतं. त्यानंतर गुरुवारी विभागीय आयुक्तांनी हा निर्णय दिला. या निर्णयात भाजपच्या उमेदवारांना मोठा झटका बसला आहे.त्यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांची निवड बिनविरोध झाल्याचं निश्चित झालं.

Updated : 29 Oct 2021 2:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top