Home > Politics > केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन

मागील तीन दिवासापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तर अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक नागरिक पुरात अडकले आहेत. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन करून केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असे आश्वासन दिले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन
X

महाराष्ट्राला गेल्या तीन दिवसापासून जोरदार पावसाने झोडपले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी दरडी कोसळून मृत्यु झाले आहेत. महाड , पाटण , कोल्हापूरसह इतरही ठिकाणी अजूनही बचावकार्य वेगाने सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचेमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन करून मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

पावसाचा सर्वात जास्त तडाखा हा कोकणाला बसला आहे. महाडमध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण मोठे आहे. तर कोकणातील सर्वच नद्यांना पूर आला असून रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे लोक अडकून पडले आहेत. अडकून पडलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे जवान युध्दपातळीवर काम करत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही मंत्रालयात येऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेत संबधित विभागाला सुचना दिल्या आहेत.

तब्बल वर्षभराच्या काळानंतर उध्दव ठाकरे हे मंत्रालयात आले होते. त्यांनी अधिका-यांची बैठक घेऊन तातडीने मदत करण्याचे आदेश दिलेत. परिस्थितीचे गांभीर्य पाहून केंद्र सरकारने देखील हेलीकॉप्टर आणि संरक्षण विभागाची मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे.

Updated : 23 July 2021 11:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top