Home > Politics > Udhav Thackrey : "तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही"

Udhav Thackrey : "तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही"

Udhav Thackrey : तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही
X

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात ४० आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये बंडखोर आमदारांबाबत संताप आहे. उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आम्ही आहोत, हे दाखवून देण्यासाठी दररोज अनेक शिवसैनिक शिवसेना भवन आणि मातोश्रीवर येत आहे.

बुधवारी देखील अनेक शिवसैनिक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील शिवसैनिकांसोबत संवाद साधला. "मी ज्यांना दिलं ते साथ सोडून निघून गेले आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही" असे भावनिक उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. यावेळी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी "साहेब आम्हाला काही नको, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा" अशा भावना व्यक्त केल्या.

त्यानंतर "ज्यांना दिले ते निघून गेले पण त्यांना ज्यांनी दिले ते माझ्यासोबत राहिले आहेत" असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकांचे आभार मानले.

Updated : 6 July 2022 11:55 AM GMT
Next Story
Share it
Top