Home > Politics > Sharad Pawar : उद्धव ठाकरेंचे वक्तव्य कशाच्या आधारावर - शरद पवार

Sharad Pawar : उद्धव ठाकरेंचे वक्तव्य कशाच्या आधारावर - शरद पवार

उद्धव ठाकरेंचे विधान शरद पवार यांनी खोडून काढले आहे. महिनाभरापूर्वी स्वत:च वर्तवलेली शक्यता फेटाळून लावली आहे. उद्धव ठाकरे यांनी कशाच्या आधारावर वक्तव्य केले, हे मी जाणून घेतलेले नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. ते नेमके कशा संदर्भात बोलले आहेत, त्यासाठी वाचा ही बातमी...

Sharad Pawar : उद्धव ठाकरेंचे वक्तव्य कशाच्या आधारावर - शरद पवार
X

गुरुवारी कसबा, चिंचवड निवडणूक प्रचारादरम्यान ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता वर्तवली होती. मात्र त्यांचे हे विधाव शरद पवार यांनी खोडून काढले आहे. काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा मध्यावधी निवडणुकीची शक्यता वर्तवली होती. ती सुद्धा फेल ठरली. आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मध्यावधी निवडणूकीची शक्यता कशाच्या आधारावर वर्तवली आहे. हे कळण्यास मार्ग नसल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. ते कसबा, चिंचवड प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पत्रकारांशी बोलत होते. पण राज्यात सध्या तरी तशी स्थिती नसल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय आयोगाने घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी यंशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेवून आभार मानले. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीवर भाष्य केले. उद्धव ठाकरे हे कशाच्या आधारावर वक्तव्य करत आहेत. हे कळण्यास मार्ग नसल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. पण मध्यावधी निवडणुका आत्ता लागतील, अशी शक्यता कमी असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.

विद्यार्थ्यांनी शरद पवार यांची भेट घेवून त्यांचे आभार मानले, आणि रात्री ११ वाजता आम्हाला भेटलात, अशा भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या. आणि यावयात तब्बल ४० मिनिटे तुम्ही उभे होतात. आमच्या व्यथा जाणून घेतल्या. तुम्ही एकमेव असे होतात. ज्यांनी आम्हाला वेळ दिला. अशा शब्दात विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावर शरद पवार यांनी विद्यार्थांना प्रश्न विचारला की, मला काय म्हातारा समजता का, अशी मिश्किल टिप्पणी केली. तसेच राष्ट्रपती राजवट हटली, त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, हे मी मजेत बोललो होतो. फडणवीस यांनी माहिती द्यावी. त्याला मी इतके महत्त्व देत नाही, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

Updated : 25 Feb 2023 7:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top